Home | Khabrein Jara Hat Ke | love leave dating leave for single female employees

सिंगल महिलांना Dating Leave देते ही कंपनी, वर्षातून मिळतात एवढ्या सुट्या 

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 24, 2019, 12:00 AM IST

या शाळेतील शिक्षकांना दिली जाते Love Leave

  • love leave dating leave for single female employees

    मेडिकल लिव्ह, कॅज्यूअल लिव्ह, मॅटरनिटी लिव्ह हे तुम्ही ऐकले असेल. पण डेटिंग लिव्हविषयी तुम्ही काही ऐकले आहे का? एका कंपनीत खास सिंगल महिलांसाठी डेटिंग लिव्ह ही सुविधा देण्यात येत आहे. ही कंपनी आपल्या फीमेल एम्प्लॉयजला डेटिंग लिव्ह देतेय. सुटीचे कारण म्हणजे, या कंपनीत काम करणा-या सिंगल महिला या सुट्यामध्ये पुरुषांना भेटू शकतील आणि आपले लव्ह लाइफ जगू शकतील. चायनातील जेहिआंग शहरातील दोन कंपन्यांमध्ये या सुट्या दिल्या जात आहेत. येथे लुनर न्यू ईयर ब्रेकदरम्यान 7 दिवसांची डेटिंग लीव्ह देण्यात येते.

    या कंपनीच्या एचआरनुसार येथे जास्तीत जास्त महिला आउटफिट डेस्कवर काम करतात. यामुळे त्या जास्त काळ बाहेर घालवू शकत नाही. यामुळे त्या फीमेल एम्प्लॉयजला या सुट्या दिल्या जातात. यामुळे त्या पुरुषांना भेटू शकतील आणि डेट करु शकतील.

    याच शहरातील Dinglan Experimental Middle School नावाच्या एका मिडिल स्कूलमध्ये प्रत्येक महिन्यात शिक्षकांना हाफ डे दिला जातो. याला Love Leave असे नाव दिले गेले आहे. सिंगल शिक्षकांना आपल्या प्रेमींसोबत वेळ घालवण्याची संधी मिळावी यासाठी हा हाफ डे दिला जातो.

Trending