आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी त्याच्यासोबत लिव्ह-इनमध्ये राहिले, त्याच्यावर मनापासून प्रेम केले, पण तो मला दारु पिऊन मारायचा, 46 वर्षांच्या अभिनेत्रीची दुःखदायी कथा 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. पूजा भट 'सडक 2' चित्रपटातून 10 वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. अनेक हिट चित्रपट देणा-या पूजाच्या ख-या आयुष्यातील कहाणी खुप दुःखदायक आहे. पूजा लग्नापुर्वी अॅक्टर रणवीर शौरीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिली. पण प्रेमाच्या बदल्यात तिला रणवीरने वेदना दिल्या. तो तिला दारु पिऊन मारहाण करायचा. 


पूजाने एका मुलाखतीत सांगितली आपल्या दुःखद कहाणी 
- पूजाने सांगितले होते - 'रणवीरवर मी मनापासून प्रेम केले, पण त्याने मला प्रेमाच्या बदल्यात दुःख दिले. त्याला दारुचे व्यसन होते. तो मला मारहाण करायचा. अखेर मला त्याच्यासोबतचे नाते मोडावे लागले.' तर रणवीर एका मुलाखतीत म्हणाला होता की, 'हो, मी दारु प्यायल्यानंतर अॅग्रेसिव्ह व्हायचो, पण पूजा दारु न पिताच वॉयलेंट व्हायची.'

 

यांच्यासोबत जोडले नाव 
रणवीरसोबत नाते मोडल्यानंतर पूजाचे नाव आमिर खान, बॉबी देओलपासून फरदीन खानसोबतही जोडले गेले. तरीही पूजाला वीजे मनीष माखीजाच्या रुपात खरे प्रेम मिळाले. दोघांची भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. 


- फक्त दोन महिन्यांच्या डेटिंगनंतर दोघांनी 2003 मध्ये लग्न केले. 11 वर्षे दोघ एकत्र राहिले आणि नंतर 2014 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर पूजाने सांगितले होते की, 'आमचे विचार खुप वेगवेगळे होते. दोघांच्या लाइफस्टाइलमध्ये खुप अंतर होते. आम्ही खोट्या दुनियेत जगत होतो आणि यामुळेच आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला.'

बातम्या आणखी आहेत...