आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी आहे आयुष्मानची लव्ह स्टोरी, लकी ठरली पत्नी ताहिरा, आता कँसरने ग्रासलं

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिद्ध बॉलिवुड अभिनेता आयुष्मान खुरानाच्या पत्नी ताहिरा कश्यपने शनिवारी सोशल मीडियावर शनिवारी धक्कादायक माहिती जाहीर केली. तिने रुग्णालयातील एक फोटो जारी करत आपल्याला स्तनांचा कर्करोग असल्याची माहिती दिली. एवढेच नव्हे, तर कर्करोगामुळे शस्त्रक्रिया करून तिचा एक स्तन काढावा लागला असेही तिने पोस्टमध्ये लिहिले आहे. आयुष्मान खुरानाने मीडियाशी संवाद साधताना आपल्या पत्नीला फायटर म्हटले आहे. आज आपण आयुष्मान खुराना आणि ताहिराची लव्ह स्टोरी जाणुन घेऊया.

 

बालपणीच्या मैत्रिणीसोबत थाटले लग्न 
आयुष्मानची पत्नी ताहिरा कश्यप त्याची बालपणीची मैत्रीण आहे. ताहिरा 16 वर्षांची असताना आयुष्मान आणि तिची पहिली भेट झाली होती. दोन्ही कुटुंब एकमेकांच्या परिचयाचे होते. जवळजवळ 12 वर्षांच्या मैत्रीनंतर दोघांनी 2011 मध्ये लग्न केले. ताहिरा आयुष्मानसाठी लकी ठरली. लग्नानंतर बॉलिवूडमध्ये त्याच्या यशस्वी करिअरला सुरुवात झाली. या कपलला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. पती अभिनेता असूनदेखील ताहिरा लाइमलाइटपासून दूर आहे. ती एक लेखिका आहे.

 

ताहिराने केली भावनिक पोस्ट 
> ताहिराने आपल्या इमोशनल पोस्टमध्ये लिहिले, की "किम कर्दाशियनला टक्कर देण्याची एक चांगली संधी मी आज गमावली आहे. हे छायाचित्र काही लोकांसाठी त्रासदायक ठरू शकते. मला झीरो स्टेजचा कॅन्सर डिटेक्ट झाला होता. कॅन्सर सेल्स झपाट्याने वाढत होते. त्यामुळे एक स्तन काढावा लागला. तरीही मी गर्वाने सांगू इच्छिते की मी आता एंजेलिना जोलीची अर्धी इंडियन आवृत्ती झाले आहे." उल्लेखनीय बाब म्हणजे, हॉलिवूड अभिनेत्री एंजेलिना जोली हिला स्तनांच्या कर्करोगामुळे दोन्ही स्तन काढावे लागले. 
> ताहिरा पुढे लिहिते, की "मस्करी बाजूला ठेवून पाहिल्यास, कर्करोगाने मला जगण्याची नवीन परिभाषा शिकवली आहे. आयुष्यातील अनिश्चिततेवर विश्वास ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. आपल्याच आयुष्यातील हिरो व्हा. आयुष्यात असे काहीच नाही, जे माणूस करू शकत नाही. मला वाटते, की कुठल्याही वयाच्या महिलेने नेहमीच सतर्क राहावे. माझे वय 35 वर्षे आहे. कुठल्याही स्वरुपाची लक्षणे दिसून आल्यास वेळीच डॉक्टरचा सल्ला घ्या. स्तनांविषयी आपण नेहमीच चिंतीत राहतो. परंतु, एक स्तन काढल्यानंतर माझे स्वतःवरील प्रेम आणखी वाढले आहे. ही पोस्ट स्वतःमध्ये लपलेल्या फायटरला समर्पित आहे."

 

बातम्या आणखी आहेत...