Home | Gossip | Love Story Of Boney Kapoor And Sridevi

B'day: श्रीदेवीसाठी बोनी कपूर यांनी मोडले होते त्याचे 13 वर्षे जुने पहिले लग्न, वाचा ही Love Story

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 11, 2018, 12:00 AM IST

पत्नी श्रीदेवींशिवाय बोनी कपूर यांचा हा पहिलाच वाढदिवस आहे.

 • Love Story Of Boney Kapoor And Sridevi

  मुंबईः बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक बोनी कपूर यांनी आज (11 नोव्हेंबर) वयाची 6३ वर्षे पूर्ण केली आहेत. सिनेमांपेक्षा ते त्यांच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. वयाच्या 28 व्या वर्षी बोनी कपूर यांनी मोना शौरीसोबत लग्न केले होते. विवाहित आणि दोन मुलांचे वडील असूनदेखील बोनी यांचा जीव अभिनेत्री श्रीदेवीवर जडला होता. मग काय पहिल्या पत्नीला बाजुला सारत त्यांनी श्रीदेवीचा हात पकडला. बोनी कपूर यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असताना श्रीदेवी लग्नपूर्वीच प्रेग्नेंट राहिली होती. त्यामुळे बोनी यांना घाईघाईत श्रीदेवीसोबत लग्न करावे लागले होते, अशी चर्चा त्याकाळात झाली होती. आता यावर्षी बोनी कपूर श्रीदेवींशिवाय आपला पहिला वाढदिवस साजरा करणार आहेत. 24 फेब्रुवारी 2018 ला दुबईच्या एका हॉटेलच्या बाथटबमध्ये बुडून श्रीदेवीचे निधन झाले होते. त्या तिथे भाचा मोहित मारवाहच्या लग्नात गेल्या होत्या.

  13 वर्षे निभावली होती पहिली पत्नी मोनाची साथ...
  मोना शौरी 18 वर्षांच्या असताना त्यांचे त्यांच्यापेक्षा वयाने दहा वर्षे मोठ्या असलेल्या बोनी कपूर यांच्यासोबत लग्न झाले होते. दोघांचे अरेंज मॅरेज होते. दोघेही या लग्नाने आनंदी होती. मुलगा अर्जुन कपूर आणि मुलगी अंशुलाच्या जन्मापर्यंत सर्वकाही नीट सुरु होते. मात्र दोघांच्या सुखी वैवाहिक आयुष्यात अचानक श्रीदेवीची एन्ट्री झाली आणि बोनी कपूर पहिली पत्नी मोनापासून कायदेशीररित्या विभक्त झाले. 13 वर्षे दोघांचे लग्न टिकले होते. 1996 साली बोनी मोना यांच्यापासून विभक्त झाले आणि श्रीदेवीसोबत दुसरा संसार थाटला.

  पुढे वाचा, श्रीदेवीवर एकतर्फी प्रेम करत होते बोनी कपूर आणि यासह बरंच काही...

 • Love Story Of Boney Kapoor And Sridevi

  श्रीदेवीवर एकतर्फी प्रेम करत होते बोनी कपूर...

   

  बोनी कपूर आणि श्रीदेवींच्या लव्हस्टोरीमध्ये अनेक चढ उतार आले आहेत. सुरुवातीला हे एकतर्फी प्रेम होते. या प्रेमाची सुरुवात 'मि. इंडिया' सिनेमापासून झाली असली तरी बोनी 1970च्या दशकात श्रीदेवी तामिळ सिनेमांत काम करत होत्या, तेव्हाच ते त्यांच्या प्रेमात पडले होते.

   

 • Love Story Of Boney Kapoor And Sridevi

  श्रीदेवींना भेटण्यासाठी चेन्नईला गेले, परंतु नाही झाली भेट...

   

  बोनी श्रीदेवींना भेटण्यासाठी चेन्नईलासुध्दा गेले होते. परंतु श्रीदेवी सिंगापूरमध्ये असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. त्याचवेळी त्यांचा 'सोलहवा साल' हा पहिला सिनेमा रिलीज झाला. हा सिनेमा पाहून बोनी प्रभावित झाले आणि त्यांनी ठरवले, की ते निर्माता म्हणून श्रीदेवीसोबत सिनेमा करणार. एकेदिवशी सिनेमाच्या सेटवर बोनी श्रीदेवींची भेट घेण्यासाठी पोहोचले. पण श्रीदेवी यांनी त्यांची काम त्यांची आई पाहते. जेव्हा ते होणा-या सासूला भेटले तेव्हा त्या म्हणाल्या, श्रीदेवी 'मि. इंडिया' सिनेमात काम करेल, परंतु तिचे मानधन 10 लाख रुपये असेल. बोनी यांनी उत्तर दिले, की ते 11 लाख रुपये देतील. श्रीदेवीच्या आईचा आनंद गगनात मावेना. अशाप्रकारे बोनी यांना आपल्या प्रेमाजवळ येण्याची संधी मिळाली. त्यांनी श्रीदेवीसाठी सर्व स्पेशल सुविधा ठेवल्या. परंतु अजूनही त्यांचे प्रेम एकतर्फीच होतेच. कारण श्रीदेवी मिथुन चक्रवर्तीवर प्रेम करत होत्या.  त्यानंतर मिथुन आणि श्रीदेवी विभक्त झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या. बोनी यांनी पुन्हा श्रीदेवीसोबत जवळीक वाढवण्यास सुरुवात केली. एकदा बोनी श्रीदेवींना भेटण्यासाठी स्वित्झर्लंडला पोहोचले होते.

   

 • Love Story Of Boney Kapoor And Sridevi

  आईच्या आजारपणामुळे संपला होता दोघांमधील दूरावा...

   

  श्रीदेवीच्या आई आजारी पडल्यानंतर या लव्हस्टोरी महत्वाचे वळण आले. त्यांच्या आईवर अमेरिकेत उपचार सुरु होते. यादरम्यान बोनी कपूर यांनी श्रीदेवींना मानसिक, भावनिक आणि अर्थिक रुपात मदत केली होती. त्यांच्या आईचे कर्जसुध्दा बोनी यांनी फेडले होते. श्रीदेवी त्यांच्या या कामाने खूप प्रभावित झाल्या आणि बोनीच्या प्रेमाला होकार दिला.
   

 • Love Story Of Boney Kapoor And Sridevi

  श्रीदेवीच्या प्रेग्नेंसीमुळे अचानक बोनी यांनी घेतला लग्नाचा निर्णय...

   

  श्रीदेवीचे नाव त्याकाळात अनेक अभिनेत्यांसोबत जुळले होते. त्याकाळात श्रीदेवी आणि मिथून चक्रवर्ती यांच्या प्रेमाचे कुस्से खूप गाजले होते. मात्र श्रीदेवींनी 1996 साली त्यांच्या फॅन्स आणि फिल्म इंडस्ट्रीतील लोकांना आश्चर्याचा धक्का देत त्यांच्यापेक्षा वयाने आठ वर्षे मोठ्या बोनी कपूरसोबत लग्न केले. असे म्हटले जाते, की श्रीदेवी हे लग्न टाळत होत्या. मात्र एका खास कारणामुळे त्यांना हे लग्न करावे लागले होते. लग्नाआधीच श्रीदेवी बोनी कपूरच्या बाळाची आई होणार होत्या. त्यामुळे गर्भवती असतानाच त्यांचे बोनी यांच्यासोबत लग्न झाले होते. आता या दाम्पत्याला खुशी आणि जान्हवी या दोन मुली आहेत. तर श्रीदेवी या जगात नाहीत.
   

   

Trending