आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देवदत्त नागे आणि श्वेता शिंदे यांची हटके लव्ह स्टोरी..! लवकरच येत आहे 'डॉक्टर डॉन'

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : प्रेक्षकांना पसंतीस पडतील अश्या मालिका 'झी युवा' ही वाहिनी नेहमीच प्रक्षेपित करत आली आहे. 'फुलपाखरू', 'फ्रेशर्स', 'लव्ह लग्न लोचा', 'बन मस्का' किंवा 'युवा सिंगर एक नंबर' या प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेल्या मालिका असोत किंवा 'साजणा', 'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण' किंवा 'प्रेम पॉइझन' अथवा 'युवा डान्सिंग क्वीन' सारख्या आता सुरु असलेल्या नव्या मालिका असोत प्रेक्षकांनी नेहमीच या सर्व मालिकांचा आनंद घेतला आहे. आता 'झी युवा'वर लवकरच आणखी एक उत्कृष्ट धमाल विनोदी मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या नव्या मालिकेचे नाव आहे "डॉक्टर डॉन"
 

देवदत्त नागे आणि श्वेता शिंदे हे नावाजलेले कलाकार मालिकेमध्ये काम करत आहे. हे दोन्ही कलाकार पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. त्यामुळे या मालिकेची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये भरपूर आहे. देवदत्त साकारत असलेली ही भूमिका त्याने आजवर केलेल्या सर्वच भूमिकांपेक्षा वेगळी आहे. देवदत्त नुकताच तानाजी या सिनेमातून प्रेक्षकांना पहायला मिळाला होता. या मालिकेत दोघेही उत्तम कलाकार त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. डॉक्टर डॉन आणि डार्लिंग डीन यांची रोमँटिक केमिस्ट्री तुम्हाला झी युवा या वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.