Home | News | Love Story Of Rajpal Yadav And Radha

9 वर्षे लहान पण उंचीने मोठी आहे राजपाल यादवची पत्नी राधा, कॅनाडात जडले एकमेंकांवर प्रेम...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 16, 2019, 12:35 PM IST

बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव 48 वर्षांचा झाला आहे

 • Love Story Of Rajpal Yadav And Radha

  मुंबई- बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव 48 वर्षांचा झाला आहे. 16 मार्च 1971 ला उत्तरप्रदेशच्या शाहजहापूरमध्ये त्याचा जन्म झाला. राजपालने एका मुलाखती सांगितले होते, की त्याची पत्नी राधा त्याच्यापेक्षा एक इंच उंच आहे. ठराविक लोकांनांच माहित असेल, की राजपाल यादवची लव्हस्टोरी कॅनाडामध्ये सुरू झाली होती.

  9 वर्षे लहान राधासोबत कशी सुरू झाली राजपालची Love Story...
  - राजपाल यादवची पत्नी राधा त्याच्यापेक्षा 9 वर्षे लहान आणि कॅनाडाची रहिवासी आहे.
  - एका मुलाखतीत राधाने तिच्या आणि राजपालच्या लव्हलाइफविषयी सांगितले होते.
  - तिने सांगितले होते, 'राजपाल एका सिनेमाच्या शूटिंगनिमित्त कॅनाडाला आला होता. तेव्हा आमचा कॉमन फ्रेंड प्रवीण डाबसने त्याची आणि माझी भेट करून दिली होती.'
  - तो तिथे केवळ 10 दिवसांसाठी आला होता. परंतु त्यावेळी असे वाटले, की आम्ही एकमेकांना 10 वर्षांपासून ओळखतो.
  - मला जाणवले, की हीच ती व्यक्ती आहे, जिच्यासोबत मी माझे आयुष्य घालवू शकते.
  - 'मी त्याला 'जंगल' सिनेमात पाहिले होते.'

  कॅलगरीच्या कॉफी शॉपमध्ये वाढली जवळीक...
  - राजपाल यादवने सांगितले की, 'ते कॅलगरीमध्ये (कॅनाडाचे एक शहर) असताना एका कॉफी शॉपमध्ये भेटले होते.'
  - यादरम्यान दोघांनी पर्सनल आणि प्रोफेशन आयुष्यावर गप्पा मारल्या.
  - त्यांनी दहा दिवसांत एकमेकांसमोर संपूर्ण भूतकाळ मांडला.


  प्रेमासाठी कॅनाडाहून भारतात आली राधा...
  - त्यानंतर दोघे 10 महिने फोनवर बोलत होते.
  - राधा भारतात शिफ्ट झाली आणि दोघांनी 2003मध्ये लग्न केले.
  - राजपाल आणि राधा एक मुलगी आहे. तिचे नाव हर्षिता असून ते तिला प्रेमाने हनी म्हणतात.


  कॅनाडमध्ये जन्मली राधा, परंतु मनाने भारतीय...
  - राधाने एकदा सांगितले होते, की ती कॅनाडामध्ये जन्मलेली असली तरी मनाने भारतीय आहे. तिला भारतीय संस्कृतीवर प्रेम आहे.
  - त्यामुळेच तिला राजपालसोबत लग्न करण्यासाठी काहीच अडचण आली नाही.


  जेव्हा राजपालने तुरुंगात काढले 10 दिवस...
  2013 मध्ये राजपाल यादव कायदेशीर कचाट्यात अडकला होता. त्यावेळी त्याने 10 दिवस तुरुंगात काढले होते. राजपालवर पाच कोटींची फसवणूक केल्याचा आरोप लागला होता. हे पैसे 2010मध्ये त्याने स्वत: दिग्दर्शित केलेल्या 'अता पता लपता' सिनेमासाठी घेतले होते. त्याच्यावर हा आरोप एका बिझनेसमनने लावला होता आणि राजपालच्या पत्नीलासुध्दा यात आरोपी सांगण्यात आले होते.

  राजपालने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे
  राजपालने पदवीपर्यंतचे शिक्षण कला शाखेतून शाहजहापूर येथे पूर्ण केले. 1992-94 मध्ये लखनऊच्या भारतेंदू नाट्य अकॅडमीमध्ये राजपालने पुढील शिक्षण घेतले. 1997मध्ये त्याने दिल्लीमधील राष्ट्रीय नाट्य विद्यालयातून नाटकात पदवी घेतली. राजपालने 1998मध्ये 'जंगल' सिनेमातून करिअरला सुरुवात केली. या सिनेमात त्याने खलनायकाची भूमिका साकारली. 'जंगल'नंतर तो कॉमिक भूमिकांकडे वळाला.


  21 वर्षांपासून बॉलीवूडमध्ये सक्रिय
  1998 पासून बॉलिवूडमध्ये सक्रिय असलेल्या राजपालने 'प्यार तूने क्या किया', 'हंगामा', 'वक्त : द रेस अगेंस्ट टाइम', 'चुप चुप के', 'गरम मसाला', 'फिर हेरा फेरी', 'ढोल', 'लेडीज ट्रेलर', 'कुश्ती' आणि 'मै मेरी पत्नी और वो'सह अनेक सिनेमांतून प्रेक्षकांना हसवले. यामध्ये 'कुश्ती' आणि 'लेडीज टेलर' सारख्या काही सिनेमांत राजपालने मुख्य भूमिका साकारल्या.

Trending