आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसऱ्या मुलासोबत लग्न ठरल्यामुळे प्रियकराने प्रेयसीवर धारदार शस्त्राने केला हल्ला, पुण्यातील डांगे चौकात घडला हा धक्कादायक प्रकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- येथील पिंपरी चिंचवडमध्ये आणखी एक प्राणघातक हल्ल्याची घटना समोर आली आहे. तरुणीचे लग्न दुसऱ्यासोबत जमल्यामुळे प्रियकराने तिच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. डांगे चौकात ही थरारक घटनेत जखमी झालेल्या तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर वाकड पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. वर्दळीच्या डांगे चौकात भर दिवसा हा हल्ला झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


काय आहे प्रकरण ?
हल्ला करणाऱ्या तरुणाचे पीडित तरुणीवर प्रेम होते. त्या तरुणीचे दुसऱ्या एका मुलाशी लग्न जमले, हा प्रकार आरोपी प्रियकराला सहन झाला नाही. त्यामुळेच त्याने टोकाचे पाऊल उचलून, तिला संपवण्याचा प्रयत्न केला. पीडित तरुणी एका हॉस्पिटलमध्ये काम करते. सकाळी ती डांगे चौकात आली असता, हल्लेखोराने तिच्यावर धारधार शस्त्राने वार केले. या हल्ल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. 

बातम्या आणखी आहेत...