आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेयसीच्या वसतिगृहात प्रियकराचा गाेळीबार, आत्महत्येचाही प्रयत्न 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे |प्रेमभंगातून प्रेयसीच्या वसतिगृहात प्रियकराने गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर स्वत:ही वसतिगृहाच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना पुण्यातील बालेवाडी येथे मंगळवारी घडली. सूरज महेंद्र साेनी (२४, रा. ग्वाल्हेर, मध्य प्रदेश) असे अाराेपीचे नाव आहे. सूरजने भारती विद्यापीठातून बीई केले अाहे. यादरम्यान त्याच्यासाेबत सासवड येथील एक तरुणी शिक्षण घेत हाेती. दोघांत प्रेमसंबंध निर्माण झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तरुणीने बालेवाडीच्या महाविद्यालयात एमबीएसाठी प्रवेश घेतला असून सध्या ती वसतिगृहात राहते. गेल्या काही दिवसांपासून तरुणी सूरजच्या मेसेज किंवा फोनला प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे सूरज चिडला होता. तिला धडा शिकवण्याच्या उद्देशाने पिस्तूल घेऊन तो लिफ्टने पाचव्या मजल्यावर प्रेयसीच्या खाेलीकडे गेला. मात्र, तिने दरवाजा उघडला नाही. त्यामुळे तो ओरडत होता. त्यानंतर त्याने पाचव्या मजल्यावरून थेट खाली उडी घेतली. यात तो गंभीर जखमी झाला. 

बातम्या आणखी आहेत...