आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेम केले म्हणून मिळाली तालिबानी शिक्षा, गावासमोर युवकाला मारले 50 बुटं, व्हायरल झाला घटनेचा व्हिडिओ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


औरंगाबाद(बिहार)- जिल्ह्यातील बनतारा गावातील सरपंचाने एका युवकाला 50 बुंट मारणे आणि 1 लाख रूपये देण्याची शिक्षा सुनावली आहे. पंचायतीत उपस्थित शेकडो लोकांसमोर युवकाला बुटाने मारहाण करण्यात आली. यावेळी लोक फक्त तमाशा पाहू लागले, अनेकांनी तर घटनेचा व्हिडिओदेखील बनवला. व्हिडिओ व्हायल होताच औरंगाबादचे एसडीपीओ राजकुमार तिवारी यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी सरपंच अख्तियार खान आणि मारहाण करणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.


शेजारील गावातील मुलीवर होते प्रेम
सांगितले जात आहे की, तरूणाचे शेजारील गावातील एका तरूणीवर प्रेम होते. मुलीच्या घरच्यांना याची माहिती मिळताच त्यांनी सरपंचाला माहिती दिली. त्यानंतर तरूणाला पकडून पंचायतसमोर आणले गेले आणि बुट मारण्याची शिवाय 1 लाख रूपये दंड भरण्याची शिक्षा सुनवाली गेली.


सरपंचाचा व्हिडिओ आला समोर
मारहाणीसोबतच दुसरा एक व्हिडिओ समोर आला आहे. यांत सरपंच शिक्षेमागचे कारण सांगत आहेत. सरपंचासमोर बसलेल्या युवकाचे हात बांधलेले दिसत आहे. सरपंच म्हणत आहे की, या तरूणामुळे माझ्या मुलीचे लग्न मोडले. त्यांचे 1 लाख 70 हजार रूपयांचे नुकसान झाले. आम्ही 70 हजार वजा करून 1 लाख रूपयांचा दंड लावला आहे. 

बातम्या आणखी आहेत...