Home | National | Other State | Lover kidnapped bride from her marriage and beaten groom and his family

'अजब प्रेमाची गजब गोष्ट', रांचीमध्ये लग्नानंतर वधुला घेऊन पळाला माथेफिरू प्रियकर, नंतर कुटुंबीयांना केली मारहाणा

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 13, 2019, 01:21 PM IST

वधुला पळवून घेऊन जाण्यासाठी आपल्या दोन मित्रांसोबत गावापासून 1 किलोमीटर दूर थांबला

  • Lover kidnapped bride from her marriage and beaten groom and his family

    रांची(झारखंड)- झारखंडची राजधानी रांचीमध्ये एक अजब प्रेमाची गजब गोष्ट समोर आली आहे. येथील एका माथेफिरू प्रियकराने लग्नानंतर सासरच्या लोकांबरोबर सासरी जात असलेल्या वधुला बळजबरीने कारमध्ये बसवून फरार झाला आहे. वधुला आपली प्रेयसी सांगणाऱ्या या माथेफिरू आशिकने घटनास्थळी आपल्या मित्रांसोबत मिळून वधुचा पती आणि त्याच्या कुटुंबीयानादेखील मारहाण केली. तरूणीच्या कुटुंबीयांनी पोलिस स्टेशनमध्ये अपहसणाची तक्रार दाखल केली आहे.


    रांचीच्या नगडी तालुक्यातील लाबेद गावात लग्न झाल्यानंतर जेव्हा वधुला वर आपले गाव खूंटीला घेऊन जात होता. तेव्हा गावाबाहेर घातल लावून बसलेल्या आरोपीने नवऱ्या मुलाची गाडी अडवली आणि त्याला बेदम मारहाण करत बधुला बळजबरीने कारमध्ये बसवून फरार झाला.


    पोलिसांनी सांगितल्यानुसार माथेफिरू प्रियकर खडगा गावचा रहिवासी आहे. तो वधुला पळवून घेऊन जाण्यासाठी आपल्या दोन मित्रांसोबत गावापासून 1 किलोमीटर दूर थांबला होता. यावेळी वधुची गाडी येताच त्याने मित्रांच्या मदतीने गाडी अडवली आणि वधुला घेऊन निघून गेला.

Trending