आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नऊ मुलांच्या आईचे नाक -कान कापून प्रियकराने लुटले २ लाख

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजकोट - गुजरातच्या राजकोटमध्ये नऊ मुलांची आई प्रियकरासोबत पळून गेली होती, परंतु प्रियकराने तिला धोका दिला. तिचे नाक - कान कापून तिच्याजवळील दोन लाख रुपये लुटून तो पळून गेला. ही महिला जखमी अवस्थेत बेशुद्ध पडली होती. ती शुद्धीवर आल्यानंतर तशाच अवस्थेत घरी परतली. तेव्हा तिच्या मातापित्यांनी तिला रुग्णालयात भरती केले. पोलिसांनी सांगितले, ही घटना लोधिका भागातील आहे. पीडितेने सांगितले,  तिचे माहेर जामनगर आहे. तेथे राहणाऱ्या सलीम नावाच्या व्यक्तीसोबत तिचे प्रेम जुळले. गेल्या ७ वर्षांपासून त्यांचे अवैध संबंध सुरू होते. सलीमने तिला मंगळवारी फोन करून पळून जाण्याची योजना सांगितली. घरात असलेली रोख रक्कम व दागिनेही सोबत आणण्याची सूचना त्याने केली हाेती. घरातून पळून आल्यानंतर सलीमने जंगलाकडे मोटारसायकल नेली. कोठे जायचे? असे त्याला विचारले असता, सलीम म्हणाला, मला पळून जायचे नाही, तर तुझ्याकडील रोख रक्कम पाहिजे, असे म्हणत त्याने पैसे हिसकावूनही घेतले. नंतर मारहाण करत नाक व कान कापला. रक्तप्रवाह जास्त झाल्याने मी बेशुद्ध पडले. पीडितेच्या जबाबावरून आरोपीचा शोध सुरू आहे.