आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

26 तोळे दागिने परिधान करून गाडीच्या फ्रंट सीटवर बसली होती महिला, पोलिसांना संशय आला म्हणून अडवली गाडी, तिने ऑफर केले 20 लाख आणि अंगावरील सगळे दागिने...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पतियाळा(पंजाब)- पंजाबमध्ये अफ्फु तस्करांनी पोलिसांच्या नजरेपासून वाचण्यासाठी नवीन शक्कल लढवली आहे. हे तस्कर आता तस्करी साठी मोठ्या लग्झरी गाड्यांचा प्रयोग करून तस्करी करत आहेत. असेच एक प्रकरण पतियाळामधून समोर आले आहे. पतियाळा पोलिसांनी अकाल अकॅडमीजवळ नाकेबंदी करून प्रेमी युगूलाला पकडून त्यांच्याकडून 3 किलो 400 ग्राम अफ्फु जप्त केले. ते दोघे हरियाणातून पजेरो गाडीने अफ्फु घेऊन पतियाळाला जात होते. डिक्कीमध्ये ठेवलेल्या अफ्फुसोबतच त्याला पॅक करण्याचे आणि मोजमाप करण्याचे सामान ठेवलेले होते. ते दोघे इतक्या बिंधास्तपण अफ्फु घेऊन जात होते की, पकडल्यावर महिलेने पोलिसांना आपल्या अंगावरील 25 तोळे सोन्याचे दागिने आणि 20 लाख रूपये लाचेची ऑफर दिली. पोलिसांनी तपास केला असता कळाले की, त्यांच्या नावावर पंजाब आणि हरियाणाच्या अनेक पोलिस ठाण्यात तस्करीचे अनेक गुन्हे नोंदवले गेले आहेत.


गाडीतून काँप्यूटर, अफ्फु पॅकिंगसाठी पाउच, सील लावायची मशीन हे साहित्य केले जप्त
एस.एस.पी. सिद्धू यांनी सांगितले- खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीवरून गुरीवारी पोलिसांनी अकाल अकॅडमी धान्य बाजार बलबेडाजवळ नाकाबंदी केली. त्यावेळी आरोपी जसविंदर सिंग उर्फ सरपंच पजेरो गाडीतून त्याची प्रेयसी अमरजीत कौर उर्फ अमरोसोबत पतियाळाकडे येत होता. त्यांची गाडी अडवून डिक्की चेक केल्यास त्यातून इंस्पेक्टर विजय कुमारला 3 किलो अफ्फु मिळाले, त्याशिवाय काँप्यूटर, अफ्फु पॅकिंगसाठी पाउच, सील लावायची मशीन हे साहित्य पोलिसांना जप्त केले.


अमरोवर पहिला गुन्हा 1990 मध्ये, त्यानंतर दरवर्षी एक

एस.एस.पी. ने सांगितले- आरोपी जसविंदर सिंगसोबत लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहणारी अमरजीत सोन्याचे दागिने परिधान करून गाडीच्या फ्रंट सीटवर बसली होती, म्हणजे कोणालाही संशय येउ नये. जसविंदरवर फतेहाबाद आणि भिवानीमध्ये 2006 आणि 2015 मध्ये गुन्हे नोंदवले गेले आहेत.


झारखंडवरून ट्रक ड्रायव्हरकडून मागवत होता अफ्फु
आरोपी जसविंदर सिंग अनेक वर्षांपासून पंजाबमध्ये नशेचा धंदा करत होता आणि झारखंडमधून ट्रक ड्रायव्हरच्या मदतीने अफ्फु मागवत होता. हा अफ्फु त्याला 1 लाख 30 हजार रूपये प्रति किलो भावाने मिळत होती. त्यानंतर त्या अफ्फुला रिफाइंड करू 3 लाख 60 हजार रूपयांच्या भानाने पंजाबमध्ये सप्लाय करत होता. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्याकडून अजून काही माहिती मिळते का त्याचा तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...