आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनेक देशांत भटकल्यानंतर अफगाणिस्तानातून भारतात पाहोचली वरीना हुसैन, सेल्स गर्लचे केले काम, मग अचानक पालटले नशीब...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेता सलमान खान आगामी 'लवरात्री' या चित्रपटातून त्याचा मेहुणा आयुष शर्माला बॉलिवूडमध्ये लाँच करत आहे. या चित्रपटात आयुष शर्मासोबत वरीना हुसैन मेन लीडमध्ये झळकणार आहे. वरीनाच्या खासगी आयुष्याविषयी सांगायचे झाल्यास, यात इमोशनपासून इन्स्पिरेशनपर्यंत सर्वकाही आहे. वरीना मुळची अफगाणिस्तानची आहे. तिचे वडील इराकचे होते, पण ते आता त्यांच्या संपर्कात नाहीत. वरीनाचा सांभाळ तिच्या आईने एकटीने केला. 

अफगाणिस्तानातील परिस्थिती आणि नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध नसल्याने वरीनाची आई तिला घेऊन अनेक देश भटकली. अखेर 2012 मध्ये वरीनाला घेऊन तिची आई दिल्लीत आली. 

 

एकेकाळी बुटिकमध्ये सेल्सगर्ल होती वरीना... 
वरीनाने सांगितल्यानुसार, ‘माझे शालेय शिक्षण दिल्लीत झाले. येथे ओपन स्कूलमधून मी 12 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. माझी फॅशन डिझायनर व्हायची इच्छा होती, पण आर्थिक परिस्थिती बेताची होती. त्यामुळे शालेय दिवसापासूनच मी काम करायला सुरुवात केली होती. ग्रेटर कैलाशच्या एका बुटीकमध्ये मी सेल्स गर्लचे काम केले. नंतर मॉडेलिंगला सुरुवात केली. अनेक कमर्शिअल्स आणि कॅटलॉग्स केले. अधिक चांगले काम करण्यासाठी आईसोबत चार वर्षांपूर्वी म्हणजे 2014 मध्ये मी मुंबईत आले.’

 

मुंबईतील लोकल ट्रेन आणि बसमध्ये खाल्ले धक्के...
वरीनाने सांगितले, ''मुंबईतील सुरुवातीच्या दिवसांत मी काही कमर्शिअल्स आणि कॅटलॉग्समध्ये काम केले. अनेक महिने एका साडीच्या जाहिरातीसाठी मुंबईहून सूरत असा बस आणि ट्रेनने प्रवास केला. हे सर्व करत असताना मी कंटाळले होते. भविष्यात पुढे काय करायचे? असा प्रश्न मला सतत पडत होता. मग एकदिवस मी अभिनयात करिअर करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ऑडिशन द्यायला सुरुवात केली. यासाठी सर्वप्रथम मी हिंदी भाषा शिकले. मग हम मॉडल्स नावाच्या एका अॅपवर स्वतःचे फोटोज अपलोड केले. एकेदिवशी सलमान खान यांच्या चित्रपटाचे कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबडा यांनी शेकडो मुलींमधून या चित्रपटासाठी माझी निवड केली. आज माझे स्वप्न पूर्ण झाले आहे. सुरुवातीच्या काळात मला बराच संघर्ष करावा लागला, पण आज मला माझ्या मेहनतीचे फळ मिळाले आहे."

 

5 ऑक्टोबरला रिलीज होणार रोमँटिक ड्रामा चित्रपट...
गुजराती बॅकग्राउंडवर आधारित हा रोमँटिक ड्रामा आहे. यामध्ये अशा एका कपलची लव्ह स्टोरी दाखवण्यात आली आहे, जी नवरात्रौत्सवात सुरु होते. चित्रपटात आयुष शर्मा आणि वरीना हुसैन लीड रोलमध्ये आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरच्या शेवटी अरबाज खान आणि सोहेल खान यांचा कॅमिओ बघायला मिळतो. अभिराज मीनावाला यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून येत्या 5 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे.  

 

बातम्या आणखी आहेत...