आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन दिवसांपूर्वीच घरातून पसार झाले होते दाम्पत्य, अशा अवस्थेत सापडले दोघांचे मृतदेह

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- सोलापूर रस्त्यावरील लोणीकंद येथील दगडी खाणीच्या पाण्यात बेपत्ता असलेल्या पती-पत्नीचा मृतदेह बुधवारी सकाळी आढळ्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मंगेश नागरे(वय-26) व प्रियंका नागरे(20) (रा. वाघोली,पुणे) अशी मृतांची नावे आहेत. मंगेश नागरे आणि प्रियंका नागरे हे दोन दिवसांपूर्वी घरातून पसार झाले होते. त्यानंतर त्यांचा सर्वत्र शोध घेऊन देखील त्यांचा काही पत्ता लागला नाही. त्यानंतर गणेश म्हस्कु नागरे(रा.वाघोली,पुणे) यांनी यासंदर्भात लोणीकंद पोलिसांकडे ते बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. 15 सप्टेंबर रोजी दोघे सकाळी दहा वाजेच्या सुमारास राहत्या घरातून पसार झाले होते.
यानंतर कुटुंबियांनी त्यांच्या नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याकडे शोध घेतला परंतु ते मिळाले नाहीत. अखेर पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला असता, बुधवारी सकाळी लोणीकंद मधील दगडी खाणीत दोन मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाण्यातून दोघांचे मृतदेह बाहेर काढले. तसेच ओळख पटवून शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात मृतदेह रवाना केले. त्या दोघांनी प्रेमप्रकरणातून आत्महत्या केली का, इतर काही घातपात आहे, यावर पोलिस तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...