आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाच्या काही दिवसांनंतर आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी गेली प्रेयसी, पण कुटुंबीयांना याबाबत नव्हती कल्पना; तीन दिवसांनंतर आलेल्या बातमीने सर्वांनाच बसला जोरदार धक्का

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


जोधपूर (राजस्थान) -  बेलावा राणाजी गावात गुरुवारी प्रेमी-युगुलांनी उशिरा रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. दोघांचे मृतदेह झाडाला लटकताना आढळून आले. स्थानिक लोकांना घटनेची माहिती कळताच त्यांनी पोलिसांना सूचना दिली. कुटुंबीय आल्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी दोघांचे मृतदेह झाडावरून खाली उतरवले. मुलीच्या वडिलांनी पोलिसांत मुलगी हरविल्याची तक्रार दाखल केली होती. मुलीच्या कुटुंबीयांना मृतदेहाची ओळख पटली. 8 मार्च रोजी मुलीचा विवाह झाला असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. 

 

मुलीच्या इच्छेविरुद्ध झाले होते लग्न 
पोलिस अधिकारी देवेंद्र सिंग यांनी सांगितले की, 20 वर्षीय युवती देवळी गुमानपुरा येथील रहिवारी होती. 14 दिवसांपू्र्वी तिचा विवाह झाला होता. मागील तीन दिवसांपासून ती बेपत्ता होती. याबाबत मुलीच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. तर मृतक युवक बेलवा येथील रहिवासी आहे. चौकशी दरम्यान समजले की, मुलीच्या इच्छेविरुद्ध तिचा विवाह करण्यात आला. यामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले.