आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमीयुगुलाने एकत्र मृत्यूला कवटाळले, 4 पानांची सुसाइड नोट वाचून दोन्ही परिवारांना झाला पश्चाताप; मृत्यू झाल्यानंतर परिवारांनी पूर्ण केली दोघांची शेवटची इच्छा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) : 8 दिवसांपूर्वी गावातुन पळुन गेलेल्या प्रेमी युगुलाने सोमवारी रात्री 11 वाजता शिर्डीमध्ये ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्त्या केली होती. त्यांनी लिहिलेली 4 पानाची सुसाइड नोट वाचून दोन्ही परिवारांना पश्चाताप झाला. त्यानंतर दोघांची सोबतच गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली होती. तापी नदीच्या काठी दोघांवर सोबतच अंत्यसंस्कार करण्यात आले. दोघांच्या मृत्यूनंतर दोन्ही परिवारांनी त्यांची शेवटची इच्छा पूर्ण केली. 


मृत्यूनंतर दोन्ही परिवारांनी मिळून पूर्ण केली दोघांची शेवटी इच्छा

दोन्ही परिवारांनी एकमेकांशी तडजोड करून दोघांचे अंत्यसंस्कार करण्याची प्रेमी युगुलांनी इच्छा व्यक्त केली होती. हे वाचल्यानंतर दोन्ही परिवारांनी शिर्डी येथून सकाळी 5 वाजता दोघांचे मृतदेह आणले. दोन्ही परिवारातील तडजोडीनंतर प्रेमीयुगूलाची सोबतच गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. सकाळी 6 वाजता तापी नदीच्या काठी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.  प्रियंकाला तिचा भाऊ राहूल आणि राधेचा मोठा भाऊ गोपालने मुखाग्नि दिला. दोन्ही परिवार यापुढील त्यांचे संपूर्ण क्रियाकर्म एकत्र मिळून करणार आहेत. 


फेसबूकवर 4 पेजचे सुसाईड नोट आणि फोटो अपलोड केला...
प्रियांकाने लिहीले की, "9 वर्षांपासून आमचे एकमेकांवर प्रेम होते. शिक्षण संपल्यावर आम्ही लग्न करणार होते. 18 डिसेंबरला राधे सोबत साखरपूडा करण्यासाठी इच्छादेवी मंदीरात गेले. त्यानंतर आम्ही घरी येणार होतो पण त्याआधीच शाळेतील मुलींना घरी सांगितले, भावाने शाळेत जाऊन चौकशी केली आणि त्यामुळेच गावात सगळीकडे ही बातमी पोहचली की आम्ही दोघे गायब झालो आहोत. गावात आमची अब्रू गेली होती. घरी गेले असते तर शाळा सोडायला लावली असती आणि राधेपासून वेगळं केलं असत. त्यामुळे आम्ही त्या दिवशी पळून गेलो. आम्हाला पाहावल नसतं की, आमच्यामुळे कुटुंबातील लोकांना त्रास होईल. आम्ही एकमेकांशिवाय नाही राहू शकत, त्यामुळे आम्ही आत्महत्त्या करत आहोत. आमची एक विनंती आहे की, मेल्यानंतर आम्हाला वेगळे करू नका. आमचा सोबतच अंत्यविधी करा." त्यांनी हे सगळे लिहून फेसबूकवर पोस्ट केले आणि आत्महत्या केली.


पप्पा मला क्षमा करा

पप्पा मला तुमच्यावर गर्व आहे. तुम्ही मला खूप प्रेम दिले. माझी प्रत्येक इच्छा तुम्ही पूर्ण केली आहे. माझ्यामुळे तुमची खूपच बदनामी झाली आहे. तुमच्या अब्रूवर काही लांछन लागू नये यासाठी आम्ही हे पाऊल उचलत आहोत. त्यामुळे मला क्षमा करा. 

बातम्या आणखी आहेत...