आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Lovers In Newlywed Attire Jumps Over Running Train While Hugging Each Other In Punjab

Car मधून थेट रेल्वे ट्रॅकवर उतरले वर-वधू, एकमेकांना दिली घट्ट मिठी; मग घेतली धावत्या ट्रेनसमोर उडी, दुसऱ्याच क्षणी उडाल्या चिंधळ्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पतियाळा - येथील रेल्वे स्टेशनच्या 23 प्लॅटफॉर्मवर एका वर आणि नववधूने ट्रेनसमोर उडी घेऊन आत्महत्या केली आहे. यातील तरुण एका प्रतिष्ठित कंपनीत अभियंता पदावर कार्यरत होता. तर तरुणी येथील महिला महाविद्यालयात प्राध्यापिका होती. रेल्वे स्टेशनवर सोमवारी सकाळी 7.30 च्या सुमारास ही घटना घडली. आत्महत्या करण्यासाठी ते दोघे वर-वधूच्या पोशाखात आले होते. एकमेकांना त्यांनी हाताने लाडू खाऊ घातला तसेच घट्ट मिठी दिली. यानंतर अचानक एकाचवेळी ट्रेनसमोर उडी घेतली. दुसऱ्याच क्षणी दोघांच्या चिंधळ्या उडाल्या.


8 वर्षांपासून होते प्रेम संबंध
- विनय सुंदरम आणि विमप्रीत कौर यांचे गेल्या 8 वर्षांपासून प्रेम संबंध होते. विवाह करणार तर आपल्या पायावर उभे राहून एखादी चांगली नोकरी करूनच करणार यावर दोघे ठाम होते. काही दिवसांपूर्वीच विनय पॉवरकॉम कंपनीत ज्युनिअर इंजिनिअर पदावर नियुक्त झाला. तर विमप्रीत सुद्धा महिला महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून जॉइन झाली. परंतु, त्यांचा दोघांचा धर्म एक नसल्याने कुटुंबियांनी लग्नास स्पष्ट नकार दिला. त्यावर हे दोघे नाराज होते असे मित्र मंडळींनी सांगितले आहे.
- तर दुसरीकडे पोलिसांनी कुटुंबियांची चौकशी केली तेव्हा आपण लग्नासाठी तयार होतो असा दावा केला. एवढेच नव्हे, तर 10 ऑक्टोबर रोजी दोघांचा साखरपुडा आयोजित करण्यात आला होता. या दोघांनी लिहिलेला सुसाइड नोट सापडला नसल्याने अद्याप कुठल्याही आरोपांवर पोलिसांना विश्वास नाही. यासंदर्भात सविस्तर तपास केला जाईल असे आश्वासन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिले आहे.


कारमधून उतरले... गळाभेट घेतली, मग...
घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांकडे आपला जबाब नोंदवला. त्यानुसार, हे दोघे सॅन्ट्रो कारमध्ये रेल्वे ट्रॅकजवळ आले होते. त्या दोघांनीही वधू आणि वराचा पोशाख घातला होता. सुरुवातीला कुणाला काहीच कळले नाही. यानंतर त्यांनी एकमेकांना लाडू खाऊ घातला. यानंतर आपल्या दिशेने येणारी ट्रेन पाहून एकमेकांची गळाभेट घेतली आणि ट्रेनसमोर उडी घेतली. लोक काही करणार यापूर्वीच दोघांच्या चिंधळ्या उडाल्या. 

 

बातम्या आणखी आहेत...