Accident / विवाहित प्रेयसीला घेऊन प्रियकराचे कारमधून पलायन; पोलिस मागे लागल्याने पाच दुचाकींना उडवले

रिसरातील विविध गावांतील लोकांनी पाठलाग करून प्रेमीयुगुलाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले

प्रतिनिधी

Jul 15,2019 01:12:59 PM IST

माढा - विवाहित प्रेयसीला पळवून नेताना कारमागे पोलिस लागल्याने प्रियकराने रस्त्यावर मध्ये आलेल्या चार ते पाच दुचाकीस्वारांना उडवून दिल्याची घटना घडली. परिसरातील विविध गावांतील लोकांनी पाठलाग करून प्रेमीयुगुलाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.


इंदापूर तालुक्यातील कांदलगावमधील विवाहितेचे येथीलच एका युवकाशी प्रेमसंबंध होते. शनिवारी त्यांना पळून जाण्याचा निर्णय घेतला. दोघेही कारमधून पळून जात असताना विवाहितेच्या नातेवाइकांना भनक लागली. त्यांनी याबाबत लागलीच पोलिसांत तक्रार दिली. त्यामुळे पोलिसांचा ताफा प्रेमीयुगुलाच्या कारमागे लागला. दरम्यान, प्रेमीयुगुल कारने भरधाव निघाले होते. परंतु पोलिस मागे लागल्याने त्यांनी कशाचीही तमा न बाळगता रोपळे, कव्हे व बारलोणी मार्गावर मध्ये येणाऱ्या ४ ते ५ दुचाकीस्वारांना उडवून दिले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, दुचाकीस्वार जखमी झाल्याने या गावांतील लोकांचा संताप वाढला आणि तेसुद्धा कारमागे वाहने घेऊन लागली. त्यामुळे प्रेमीयुगुलाने ढवळस येथे कार सोडून येथील रेल्वे स्टेशनकडे पळ काढला. नागरिकांनी त्यांचा पिच्छा पुरवत दोघांनाही शोधून काढले आणि पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केली आहे.

X
COMMENT