Home | National | Other State | lovers suicide in front of train in Karauli Rajasthan

2 मुलांच्या आईला 7 वर्षे लहान मुलावर जडले प्रेम, दोघेही एका गोष्टीमुळे घाबरले आणि ट्रनसमोर उडी मारून केली आत्महत्या...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 13, 2019, 12:07 AM IST

अशी एकमेकात निर्माण झाली होती जवळीक.

  • करौली(राजस्थान)- बयाना-हिण्डौन रेल्वेमार्गावर बुधवारी रात्री एका विवाहितेने आपल्यापेक्षा 7 वर्षे लहान प्रियकरासोबत ट्रेनसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. मृतक युवक शिवराम पुत्र (22) करौली जिल्ह्यातील राहणारा आहे तर मृत महिला 29 वर्षीय पार्वती (बदलेले नाव) भुसावर परिसरातील राहणारी आहे.


    ती आपल्या दोन्ही मुलांच्या शिक्षणासाठी बमनपूरा परिसरात किरायाच्या घरात राहत होती. तर शिवराम अविवाहित होता आणि तोही बमनपुरामध्ये त्याच घरात किरायाने राहून स्पर्धात्मक परिक्षांचा अभ्यास करत होता.


    एएसआय पदमसिंह यांनी सांगितले की, रेल्वे पोलिसांच्या सुचनेनंतर पोलिसांनी घटनास्थळावरून दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमला पाठवले आणि त्यांच्या कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर गुरूवारी पोस्टमॉर्टम करून मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. पोलिसांनुसार आधी महिलेने उडी मारली आणि नंतर युवकाने उडी मारली.


    परिसरातील लोक नाव ठेवायचे
    दोघांच्या प्रेमसंबधांची माहिती हळु-हळु पूर्ण परिसरात पसरली. त्यामुळे महिलेच्या घरी तणाव वाढु लागला आणि त्यामुळेच आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.

Trending