Home | Business | Auto | low-commercial-vehicle-sale

हलक्या वाणिज्यिक वाहनांच्या विक्रीत घट

team divya marathi | Update - May 24, 2011, 07:47 PM IST

हलक्या वाणिज्यिक वाहनांच्या विक्रीत एप्रिल महिन्यामध्ये घट झाली आहे.

  • low-commercial-vehicle-sale

    हलक्या वाणिज्यिक वाहनांच्या विक्रीत घट

    हलक्या वाणिज्यिक वाहनांच्या विक्रीत एप्रिल महिन्यामध्ये घट झाली आहे. प्रमुख बॅंकांतर्फे देण्यात येणा-या कर्जाचे व्याजदार वाढल्यामुळे ही घट दिसुन येत आहे. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सच्या आकडेवारीनुसार एप्रिल पॅसेंजर कॅरियरच्या विक्रीत 25.89 टक्के घट झाली आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये ४४८१ वाहनांची विक्री झाली होती. तर यावर्षी हा आकडा ३३२१ होता. मालवाहू वाहनांच्या विक्रीत मात्र २२ वाढ दिसून आली आहे.
    हलक्या वाणिज्यिक वाहनांसाठी प्रमुख बॅंका ११.७५ ते १४ टक्के व्याजदराने कर्ज देतात. तर गैर बॅंकिंग फायनान्स कंपन्या १७ ते १८ टक्के व्याजदराने कर्ज देतात. व्याजदार वाढल्यामुळे साजजिकच विक्रीवर परिणाम झाला आहे. वाढलेल्या व्याजदरांसोबतच मार्जिन मनीमध्येही वाढ झाली आहे. खासगी कंपन्या २५ ते ३० टक्के मार्जिन मनी घेतात. त्यामुळे ग्राहकांना ७० ते ७५ टक्केच कर्ज मिळते.

Trending