आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्यासाठी भाग्यशाली ठरू असतात हे मासे; तुम्हीही दीड लाखांची गुंतवणूक करुन महिन्याला कमवू शकता दोन लाख रुपये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- अ‍ॅक्वेरियममध्ये रंगीबिरंगी मासे सर्वांना आवडतात. आपल्याकडे काही खास रंगाच्या जसे की गोल्ड मासा, मोली मासा या माशांना घरात ठेवणे सौभाग्याचे प्रतीक मानतात. परंतु हेच मासे तुम्हाला धनाढ्य बनवू शकतात. हो हे शक्य आहे हा चमत्‍कार नसून घरातील सजावटीसाठी या माशांचा व्यापारदेखील केला जातो. यात गोल्‍ड मासा आणि अनेक प्रकारचे रंगीबिरंगी माशांची किंमत 2500 रुपयांपासून ते 28 हजारांपर्यंत असू शकते. त्यामुळे तुम्हीही सुरवातीला 1 ते 1.5 लाख रुपये गुंतवणूक केली तर महिन्याला तुम्ही 2 लाख रुपये कमवू शकतात.

 

या माशांचा लिलावदेखील होतो

तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल परंतु गोल्ड एरवॉन माशांच्या प्रजातीसारख्या अनेकप्रकारच्या माशांवर बोली लावली जाते. मोठ्या शहरांत या माशांवर लिलावांत जवळपास 50 हजार रुपयांपेक्षा जास्त किंमतीवर बोली लागते. 

 

1 ते 1.5 लाख रुपये सुरवातीचा खर्च
या रंगीबिरंगी माशांचा व्यापार करण्यासाठी सुरवातीला एक ते दीड लाखरुपयांची गुंतवणूक करावी लागते. तुम्हाला मासे ठेवण्यासाठी जवळपास 100 वर्गफूट अॅक्वेरीयम टॅंकसाठी 50 हजार रुपये खर्च येतो. त्यानंतर वेगवेगळ्या प्रजातीच्या माशांच्या बियानांची किंमत 100 ते 500 रुपये प्रती नग रुपयांप्रमाणे मासे खरेदी करता येतात. खरेदी केलेल्या माशांमध्ये नर आणि मादीचे प्रमाण 4:1 असा ठेवतात.

 

रंगीबिरंगी माशांचे प्रकार 
जगभरात जवळपास 600 प्रकारचे रंगीबिरंगी माशांचा प्रजातींचा वापर सजावटीसाठी केला जातो. यात दोनशेहुन अधिक माशांच्या प्रजाती भारतात मिळतात. परंतु काही दुर्मीळ माशांच्या प्रजातींच्या माशांची किंमत काही हजारांपेक्षा जास्त असते. यात गोल्डन एरवॉन, चायनीज फ्लॉवर हॉर्न, इंडियन फ्लॉवर हॉर्न, डिस्कन आणि पेस्ट मासा या प्रजातींना जास्त किंमती आहे. या माशांची किंमत जवळपास 2500 ते 28000 रुपयांपर्यंत असते. यात गोल्डन एरवॉन माशाची किंमत सर्वात जास्त म्हणजे 28000 रुपये आहे.

 

पुढच्या स्लाइडवर वाचा- किती दिवसांनंतर होते कमाई

 

बातम्या आणखी आहेत...