आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 लाख रूपयांपासून सुरू करा चप्पल बनवण्याचा व्यवसाय, महिन्याला करू शकता 1.5 लाखांची कमाई....

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली-  तुम्हाला घर बसल्या कमी पैशात जास्त प्रॉफिट मिळवायचे असेल तर, चप्पल बनवण्याचा व्यवसाय तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. या व्यवसायाची खास गोष्ट म्हणजे गाव असो वा शहर या व्यवसायाची डिमांड सगळीकडेच आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचे प्रोडक्ट विकण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. तुम्ही या व्यवसायाला छोट्या जागेतही सुरू करू शकता, आणि जशी डिमांड वाढेल, तुम्ही तुमच्या व्यवसायाला वाढवू शकता. साधारणपणे या व्यवसायात तुम्हाला 2 लाखांची गुंतवणूक करावी लागेल. व्यवसाय चालला तर तुम्ही दर महिना 1.5 लाख रूपये कमवू शकता. जाणून घ्या या व्यवसायासंबधी...

 

अशी तयार होते चप्‍पल 
गझियाबादमध्ये चप्‍पल बनवण्याची फॅक्‍ट्री चालवणारे राजकुमार यांनी सांगितले की, तुम्ही चप्‍पल बनवायचे काम घरी किंवा एखाद्या छोट्या कमर्शिअल स्‍पेसमध्ये ही सुरू करू शकता. यासाठी तुम्हाल काही छोट्या मशीनची आवश्यकता आहे. सगळ्यात आधी तुम्हाला रबर शीटला पायाच्या नंबर प्रमाणे बनवलेल्या साच्यात टाकून सोल कटिंग मशीनमध्ये कट करावे लागेल. या मशीनमध्ये चप्पलच्या स्ट्रिपसाठी छिद्रही पाडल्या जाते. त्यानंतर ग्रायंडिग मशीनवर तुम्ही त्या चपलीला घासून मऊ करू शकता. त्यानंतर त्या नंबर प्रमाणे स्ट्रिप टाका. बस तुमची चप्पल तयार झाली.

 

किती होते कमाई? 
साधारणपणे एक जोडी चप्पल बनवण्यासाठी 20 ते 30 रूपये लागतात. तर या चपलांना होलसेल किमतीत तुम्ही 50 ते 60 रूपयांत विकू शकता. वीज आणि इतर खर्च वगळता, तुम्ही एका जोडी मागे 10 रूपये कमवू शकता. ही मशीन एका तासात अंदाजे 80 चप्पल तयार करते, तर दिवसांतुन 8 तास काम केल्यावर 640 चपलांच्या जोडी तयार होतात. त्यानुसार एका आठवड्याला 38,400 रूपयांची कमाई या हिशोबाने महिन्याला 1.5 लाखांची कमाई होते. 

 

पुढे वाचा- बिझनेस सुरू करण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी 

 

बातम्या आणखी आहेत...