आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईतील पहिल्या नाईट लाईफची सुरुवात झोकात, मात्र शेवट म्हणावा तसा नाही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आदित्य ठाकरेंची वरळी-सीफेसच्या वरळी फेस्टिव्हलला भेट
  • मुंबईत काही ठिकाणी रात्री तीनपर्यंत नाईट लाईफ सुरू राहिली
  • असे आहेत नाईटलाईफचे नियम

मुंबई - 26 जानेवारी 2020 पासून मुंबईत नाईट लाईफला सुरुवात झाली आहे. नाईट लाईफच्या पहिल्या रात्रीची सुरुवात तर झोकातच झाली, शेवट मात्र म्हणावा तसा झाला नाही. मुंबईच्या या पहिल्या नाईट लाईफच्या पहिल्या रात्रीला व्यावसायिकांनी दिलेला प्रतिसाद थंडच म्हणावा लागेल. काही ठिकाणी रात्री तीनपर्यंत नाईट लाईफ सुरू राहिली. त्यामुळे नाईट लाईफच्या पहिल्या रात्री म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. आदित्य ठाकरेंची वरळी-सीफेसच्या वरळी फेस्टिवलला रात्री हजेरी


वरळी सी-फेसवर रात्री दहाच्या सुमारासही दिवसभर असते तेवढीच गर्दी होती. मुंबईची नाईट लाईफ अधिकृतरित्या आता सुरु होणार त्यामुळे ही गर्दी जरा जास्तच उत्साहात होती. मुंबई 24 तास जागती ठेवण्याची ही कल्पना ज्यांच्या डोक्यातून आली त्या आदित्य ठाकरेंनीही वरळी-सीफेसच्या वरळी फेस्टिवलला रात्री हजेरी लावली.असे आहेत नाईटलाईफचे नियम 


पोलीस, मुंबई महापालिका, उत्पादन शुल्क विभाग, कामगार विभाग, पर्यटन विभाग यांची काय काय जबाबदारी असणार याचे नियम आहेत. नाईट लाईफमध्ये सहभागी मॉल, रेस्टॉरंट यांनी कुठले नियम पाळणे गरजेचे आहे, याची विस्तृत नियमावली महापालिकेने बनवली आहे. रात्री दीड वाजेनंतर दारु बंद असणार आहे. रात्री दीड वाजेपर्यंतच मद्यविक्रीस परवानगी असणार आहे. रात्री दीड वाजेनंतर दारु विकताना आढळल्यास संबंधितांचा परवाना दोन वर्षांसाठी रद्द केला जाईल. तसेच तेथील मॉल किंवा मिलला नाईटलाईफ सुरु ठेवण्यास परवानगी नाकारली जाईल. कामगार कायद्याची पूर्णपणे अंमलबजावणी केली जाईल.

जुहू चौपाटी, गिरगाव चौपाटी, बीकेसी, वरळी सी फेस, वांद्रे बँडस्टँड, नरिमन पॉईंट रोड आणि एनसीपीए कॉर्नर या ठिकाणी फूड ट्रक लावण्यास परवानगी दिली जाईल. परंतु एका ठिकाणी पाच फूड ट्रक उभे राहतील, जे रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत सुरु राहतील.

बातम्या आणखी आहेत...