Home | Maharashtra | North Maharashtra | Nashik | low temperature in nashik

शहरवासीय थंडीने कुडकुडले, किमान तपमान 8.2 अंशांवर, कडाक्याच्या थंडीमुळे नाशिककर गारठले

प्रतिनिधी | Update - Dec 18, 2018, 10:42 AM IST

शेकाेटीभाेवती गप्पांचे असे फड रंगू लागले अाहेत

  • low temperature in nashik

    नाशिकरोड - शहरात दोन आठवड्यापासून किमान तपमान १० अंश सेल्सिअसच्या दरम्यान असल्याने रात्री व सकाळी वातावरणात चांगलाच गारवा जाणवत होता. रविवारी सायंकाळपासून वातावरणात थंडीचा कडाका वाढल्याने सोमवारी सकाळी किमान तपमान हे ८.२ अंशांची नोंद करण्यात आली होती. कमाल तपमान २५.४ अंश सेल्सिअसवर असल्याने दिवसाही गारवा जाणवत असल्याने शहरवासीय ऊबदार कपडे परिधान करण्यासह गरमागरम पदार्थांवर ताव मारताना दिसत होते.

    उत्तर भारताकडून गार वारे वाहत असले तरी सध्या आकाश हे निरभ्र असल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. नाशिक शहरात कमाल २५.४ तर किमान ८.५ अंश सेल्सिअस नोंद करण्यात आली आहे. सायंकाळनंतर गारठ्यामुळे रस्त्यावर ९ वाजेपासूनच शुकशुकाट दिसून येत होता. तर सकाळी जॉगिंग ट्रॅकवर जाणारे नागरिक चहाच्या टपरीवर बसून वाफाळता चहा घेण्याला पसंती देत असल्याचे चित्र दिसत आहे. तर दिवसा भजे, वडे अशा गरम पदार्थांना शहरवासीयांकडून पसंती दिली जात होती. शहरातील चौकाचौकामध्ये रात्री उशीरापर्यंत शेकोटीभोवती गप्पा मारणारे तरुण दिसून येत आहेत. मात्र, सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे मात्र थंडीमुळे हाल होत आहेत. या आठवड्यात दोन ते तीन दिवस तपमान घसरणार असल्याचा अंदाज आहे.

Trending