आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • LPG Cylinder Explosion In Delhi Factory Latest News And Update

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भीषण दुर्घटना: कारखान्यात एलपीजी सिलिंडरचा विस्फोट, छत पडले; चिमुरड्यासह 7 जण ठार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फॅक्टरीत इमर्जन्सी गेट नव्हते, आग शमवण्याची नव्हती सोय
विस्फोटामुळे आजूबाजूच्या घरांच्या काचा फुटल्या, 4 जणांची प्रकृती नाजूक

 

नवी दिल्ली - पश्चिम दिल्लीच्या मोती नगर परिसरात गुरुवारी रात्री पावणे नऊ वाजता एका कारखान्यात एलपीजी सिलिंडरचा विस्फोट झाला. यामुळे इमारतीची छत पडली. अपघातात 5 वर्षीय बालकासमवेत 7 जण ठार झाले. फॅक्ट्री मालकासह आठ जण जखमी झाले आहेत. चार जणांची प्रकृती नाजूक आहे.
 

न्यूज एजन्सीने डीसीपी मोनिका भारद्वाज यांच्या हवाल्याने सांगितले की, ही घटना सुदर्शन पार्क परिसरात घडली. ढिगाऱ्यातून 15 जणांना बाहेर काढण्यात आले. आचार्य भिक्षू रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यापैकी सात जणांना मृत घोषित करण्यात आले. जखमींमध्ये चार जणांची प्रकृती नाजूक आहे. त्यांना सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्यांनी सांगितले की, फॅक्टरीत सीलिंग फॅनवर पेंट करण्याचे काम होते.

 

इमर्जन्सी गेट नव्हते...
सूत्रांच्या मते, फॅक्ट्रीमध्ये एकच दरवाजा होता. यामुळे लोकांना बाहेर काढण्याची संधी मिळाली नाही. फॅक्ट्रीमध्ये आग विझवण्याची सुविधाही नव्हती. बहुतांश जणांचा होरपळून मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींनुसार, विस्फोट एवढा मोठा होता की, आसपासच्या काही घरांच्या काचाही फुटल्या.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित काही फोटोज...