आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी सरकारने नवीन वर्षात दुसऱ्यांदा केली गॅस सिलेंडरच्या किंमतीत कपात, आता इतक्या रुपयांना मिळणार LPG गॅस सिलेंडर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


न्यूज डेस्क : एकाच महिन्यात तिसऱ्यांदा LPG सिलेंडरच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. आता सबसिडी मिळणाऱ्या सिलेंडरची किंमत 1.46 तर गैर-सबसिडी सिलेंडर 30 रूपयांनी स्वस्त झाले आहेत. 1 फेब्रुवारी रात्री 12 वाजेपासून नवीन दर लागू करण्यात आले आहेत. 


LPG सिलेंडरचे नवीन दर

> दिल्लीत सिलेंडरची (14.2kg) किंमत 494.99 होती
> ही घट झाल्यानंतर आता सबसिडी मिळणारे सिलेंडर 493.53 रूपयांना मिळणार आहे. 
> दिल्लीत सध्या गैर-सबसिडी सिलेंडरची किंमत 689 रूपये होती. 
> किंमत कमी झाल्यानंतर गैर-सबसिडी सिलेंडर 659 रूपयांना मिळणार आहे. 

 

इंडियन ऑईलने दिला माहिती
देशातील सर्वात मोठी घरगुती गॅस कंपनी इंडियन ऑईलने दर कमी झाल्याची माहिती दिली. आंतरराष्ट्रीय बाजारात LPG दर कमी झाल्याने, तसेच भारतीय रुपया वधारल्याने हे दर कमी करण्यात आल्याचे इंडियन ऑईलने सांगितले. 


एका महिन्यात तिसऱ्यांदा कपात 

एका महिन्यात सलग तिसऱ्यांदा सिलेंडरच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. यापूर्वी 1 डिसेंबर रोजी सबसिडी LPG सिलेंडरची  किंमत 6.52 रूपयांनी तर गैर-सबसिडी सिलेंडरची किंमत 133 रूपयांनी कमी करण्यात आली होती. तर 1  जानेवारी 2019 रोजी सबसिडी LPG सिलेंडरचे दर 5.91 रूपयांनी कमी झाले होते. दुसरीकडे गैर-सबसिडी सिलेंडर 120.50 रूपयांनी स्वस्त करण्यात आले होते. 


बँकेत येणाऱ्या सबसिडीत होणार घट
सिलेंडरच्या किंमती कमी झाल्यामुळे बँकेत येणारी सबसिडी देखील कमी होणार आहे. जानेवारीत प्रति सिलेंडर 194.01 रुपये सबसिडी मिळत होती. त्यात घट होऊन 165.47 रुपये सबसिडी मिळणार आहे. याआधी नोव्हेंबरमध्ये 433.66 रूपये आणि डिसेंबरमध्ये 308.60 रूपयांची सबसिडी मिळाली होती. 

बातम्या आणखी आहेत...