आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • LPG Cylinder Truck Burst, Several Cylinders Exploded; The 26 Children In The School Bus Were Safely Rescued

एलपीजी सिलेंडरने भरलेल्या ट्रकला धडकेमुळे लागली आग, अनेक सिलेंडरचा झाला स्फोट; शाळेच्या बसमधील 26 मुले थोडक्यात बचावली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सूरत : गुजरातच्या सूरतमध्ये एलपीजी सिलेंडर घेऊन जात असलेला मिनी ट्रकची गुरुवारी सकाळी साडे 6 वाजता त्याच्यापुढे असलेल्या ट्रकसोबत धडक झाली. यानंतर मिनी ट्रकमध्ये आग लागली आणि एक एक करून अनेक सिलेंडर ब्लास्ट झाले. घटना ओलपाड रोडवर घडली. यादरम्यान डिव्हायडरच्या दुसऱ्या बाजूने जात असलेली स्कूल बस, ऑटो यांसह तीन वाहने या स्फोटाची शिकार झाले. बसमध्ये 26 मुले होती, ज्यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरक्षितपणे बाहेर काढले. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. 


रेडियंट इंटरनेशनल स्कूलची बस सकाळी मुलांना घेऊन शाळेकडे निघाली होती. घटनेनंतर अग्निशमन दलाच्या 10 गाड्यांनी काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. यादरम्यान रस्त्यावरील रहदारी बंद होती. स्फोटानंतर आवाज दूरपर्यंत ऐकू येत होते. एक प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, आधी गॅस सिलेंडरने भरलेल्या ट्रकच्या कॅबिनमध्ये आग लागली. मग तो अनियंत्रित होऊन पुढे असलेल्या सीमेंटच्या ट्रकला धडकला. त्यानंतर सिलेंडरचे स्फोट सुरु झाले. 

या भागामध्ये रिफलिंगच्या अवैध व्यवसायाची शंका


घटनेच्या तपासणीसाठी एफएसएलच्या टीमला पाचारण करण्यात आले होते. असे सांगितले जात आयचे की, या भागामध्ये गॅस रिफलिंगचा अवैध व्यवसाय सुरु असल्याची शंका आहे. त्यामुळे अशीही शक्यता आहे की, एलपीजी सिलेंडरमधून गॅस काढताना लिकेज राहिले असलं. आगीचे कारणही हेच असू शकते. पोलिस ट्रकचे ड्रायव्हर-कंडक्टरचा शोध घेत आहेत.