आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • LS Speaker Suspended Sumitra Mahajan 12 TDP Members Uproar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लोकसभेत वेलमध्ये गदारोळ घालणारे टीडीपीचे 12 खासदार निलंबित, 2 दिवसांत 36 सदस्यांना बाहेरचा रस्ता

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी गुरुवारी टीडीपीच्या 12 खासदारांना निलंबित केले. हे सर्व खासदार चर्चेच्या वेळी वेलमध्ये येऊन गदारोळ घालत होते. लोकसभा अध्यक्षांनी यावर नाराजी व्यक्त करत सदस्यांना इशारा दिला होता. पण तरीही ते ऐकले नाहीत. गोंधळामुळे संसदेचे कामकाजही दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. 


बुधवारी निलंबित झाले होते अण्णाद्रमुकचे खासदार 
लोकसबेत रफाल डीलबाबत गुरुवारपासू चर्चा सुरू आहे. यादरम्यान संसदेत मोठा गदारोळ पाहायला मिळत आहे. एक दिवसापूर्वीही लोकसभा अध्यक्षांनी नियम 374ए अंतर्गत अण्णाद्रमुकच्या 24 खासदारांना पाच दिवसांसाठी निलंबित केले होते. रूल 374ए नुसार अध्यक्षांना संसदेच्या कामकाजात अडथळा आणणाऱ्यांवर निलंबनाच्या कारवाईचा अधिकार असतो. 

 
विरोध करणे आमचा अधिकार 
अण्णाद्रमुकचे निलंबित खासदार एम तंबीदुरई म्हणाले की, निवडणुका जवळ येत आहेत. भाजपला तमिळनाडूमध्ये काही जागा जिंकायच्या आहेत. त्यामुळेत कर्नाटकात मेकेदातू डॅम योजनेला मंजुरी देण्यात आली. विरोध करणे हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. सरकारकडून आमच्या प्रश्नांची काहीही उत्तरे देण्यात आली नाहीत.