आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Lt. Anil Puri Becomes The First Indian To Complete The 1200 Km Long Bicycle Race In 90 Hours

लेफ्टनंट अनिल पुरी १२०० किमी लांब सायकल स्पर्धा ९० तासांत पूर्ण करणारे ठरले पहिले भारतीय 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस/नवी दिल्ली : भारतीय लष्करातील लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांनी फ्रान्समधील सर्वात जुनी १२०० किमी लांबीची स्पर्धा सलग ९० तास सायकल चालवून पूर्ण केली आहे. ही स्पर्धा पूर्ण करणारे ते पहिले सर्व्हिंग जनरल ठरले आहेत. ५६ वर्षीय अनिल यांनी ही स्पर्धा पॅरिस -ब्रेस्ट- पॅरिसदरम्यान पूर्ण केली. स्पर्धेत भारतासह ६० देशांतील ६५०० स्पर्धकांनी भाग घेतला. यात भारतातील ३६७ नागरिक सहभागी झाले होते. यापैकी केवळ ८० जणांनी अरडाेस ट्रॅक पूर्ण केला. इतरांनी स्पर्धा सोडून दिली. सायकलिंग इव्हेंट सर्वात कठीण स्पर्धेपैकी एक आहे. कारण स्पर्धेदरम्यान स्पर्धकांना टप्प्याटप्प्याने ३१ हजार फूट उंची गाठावी लागते. हे माउंट एव्हरेस्ट पूर्ण करण्यासारखे आहे. स्पर्धकाला सुमारे चार दिवस न झोपता ही स्पर्धा पूर्ण करावी लागते. हे यश प्राप्त करून अनिल यांनी त्या सहा लष्करी अधिकाऱ्यांच्या श्रेणीत आपले नाव समाविष्ट केले आहे. या अधिकाऱ्यांनी करिअरमध्ये न थांबता कमीत कमी १००० किमी सलग सायकलिंग केली आहे. ४ दिवस न झोपता पूर्ण करावी लागते स्पर्धा. 

मेंदू चांगले यंत्र, ते उत्साहित ठेवण्याची गरज : अनिल पुरी 
स्पर्धा पूर्ण केल्यानंतर अनिल पुरी यांनी म्हटले, माणसाचा मेंदू एक चांगले यंत्र आहे. त्याला उत्साहित ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी दर ३ ते ५ वर्षांनी भौतिक व इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात आपले हित व छंद बदलण्याची गरज आहे. निसर्गावर आपण विजय मिळवू शकत नाही हे यातून शिकण्यास मिळते, असे पुरी यांनी सांगितले. 

स्पर्धेदरम्यान ३५ ते ३ अंश सेल्सियस तापमानातून जावे लागले 
ही स्पर्धा खूप कठीण असते. कारण स्पर्धेदरम्यान स्पर्धकांना अनेक ठिकाणी ३५ ते ३ अंश सेल्सियसमध्ये हवामान परिस्थितीशी झगडावे लागते. याशिवाय दोन्ही दिशेने वेगाने येणाऱ्या वाऱ्याचाही सामना करावा लागतो. या वेळी स्पर्धकांच्या धैर्याची परीक्षाच असते. लेफ्टनंट जनरल पुरी म्हणाले, आपण भारतातील डोंगरांवर सायकल चालवत नाही. आपली शहरे समतल आहेत. यामुळे स्नायूचा विकास योग्य न झाल्याने लवकर थकतो, असे त्यांनी सांगितले. 

ला अल्ट्रा द हाय रेस : १२६ तासांत ५५५ किमी धावणारा पहिला भारतीय आशिष 
लडाख : महाराष्ट्रातील पुण्याचा आशिष कासोडेकर (४७)'ला अल्ट्रा द हाय' स्पर्धा पूर्ण करणारा पहिला भारतीय ठरला आहे. लडाखमध्ये ही स्पर्धा माणसाची शारीरिक क्षमता व आवड ओळखण्यासाठी असते. ५५५ किमी लांबीची ही स्पर्धा १३२ तासांत पूर्ण करायची असते. परंतु आशिषने ती १२६ तास १८ मिनिटांत पूर्ण केली. आशिषसह फक्त तीन धावपटूंनी ही स्पर्धा पूर्ण केली. यातील दोघे परदेशी होते. या यशाबद्दल बोलताना आशिषने सांगितले, लडाखमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण खूप कमी असते. यासाठी स्पर्धेदरम्यान मला कडक तापमानाचा सामना करावा लागला. तांग लाची चढाई करताना सूर्याच्या किरणांचा अडथळा येत होता. स्पर्धेत भाग घेण्यावरून मी गोंधळलो होतो. माझी ५५५ किमीच्या श्रेणीत धावण्याची पात्रता होती. संधी मिळाली आहे तर आता माघार घ्यायची नाही, असे त्याने सांगितले. २०१८ मध्ये लडाखमध्ये ही स्पर्धा पूर्ण केली होती. 

बातम्या आणखी आहेत...