आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Lt Gen Ranbir Singh: GOC In Chief Northern Command, Says First Surgical Strike Conducted In September 2016

राजकारणी काहीही दावा करू द्या, पण पहिली सर्जिकल स्ट्राइक 2016 मध्येच झाली- कमांडिंग-इन-चीफ लेफ्टिनेंट जनरल रणबीर सिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- उत्तरेकडील कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ लेफ्टिनेंट जनरल रणबीर सिंग यांनी सर्जिकल स्ट्राइकवर नवीन खुलासा केला आहे. ते म्हणाले की, काही दिवसांपूर्वी डीजीएमओने एक आरटीआच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, सप्टेंबर 2016 मध्ये एकच सर्जिकल स्ट्राइक झाली आहे. आम्ही जे सांगत आहोत, त्यात तथ्य आहे. राजकारणी पक्ष काहीही सांगो,त्यांना सरकार उत्तर देईस. काही दिवसांपूर्वी निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस नेते राजीव शुक्ला यांनी दावा केला होता की, यूपीएच्या काळात 6 वेळा सर्जिकल स्ट्राइक झाली होती.

 

पुढे ते म्हणाले की, बालाकोटमध्ये दहशदवाद्यांवर हवाई हल्ला, लष्कराचे मोठे यश आहे. यात आमचे विमान शत्रुंच्या एरियात आतपर्यंत घुसले होते आणि त्यांचा कँप उद्धवस्त केला होता. पाकिस्तानने दुसऱ्या दिवशी हवाई हल्ला केला, पण त्यांना चोख उत्तर देण्यात आले. यावर्षी आपल्या जवानांनी 86 दहशदवाद्यांना कंठस्नान घातले आहे, तर 20 पेक्षा जास्त जणाना अटक करण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात आमचे हे अभियान चालतच राहील.


यूपीएच्या कार्यकाळात 6 वेळेस सर्जिकल स्ट्राइक
2 मे रोजी काँग्रेस नेते राजीव शुक्ला यांनी ट्वीट करून सांगितले होते की, यूपीएच्या कार्यकाळात सर्जिकल स्ट्राइक झाल्या होत्या. पहिली सर्जिकल स्ट्राइक 19 जून 2008 ला असम राइफल्स, गोरखा रेजीमेंटने भत्तल सेक्टर, पुंछमध्ये केली होती. दुसरी स्ट्राइक 30 ऑगस्ट आणि एक सप्टेंबर 2011 ला शारदा सेक्टरमध्ये राजपूत आणि कुमायूं रेजीमेंटने केली होती. तिसरी स्ट्राइक 6 जून 2013 ला सावन पात्रा चेकपोस्टवर झाली होती. चौथी स्ट्राइक 27-28 जुलै 2013 ला नाजपीर सेक्टरमध्ये झाली होती. पाचवीं स्ट्राइक 6 ऑगस्त 2013 ला नीलाम व्हॅलीमध्ये झाली होती आणि सहाव्वी सर्जिकल स्ट्राइक 14 जानेवारी 2014 ला झाली होती.


मोदींनी मारला टोला
सर्जिकल स्ट्राइक केल्याच्या काँग्रेसच्या दाव्यावर मोदी म्हणाले- काँग्रेसचे एका नेत्याने विधान केले आहे की, आमच्या काळातदेखील सर्जिकल स्ट्राइक झाल्या. या कशाप्रकारच्या सर्जिकल स्ट्राइक होत्या, यात ना दहशदवादी मारल्या गेले ना भारत पाकीस्तानमधील लोकांना कळाले.


मोदी म्हणाले- काँग्रेसवाले आधी म्हणायचे सर्जिकल स्ट्राइक काही नसतं. आधी त्यांनी सर्जिकल स्ट्राइकचा मजाक उडवला. एसी रूममध्ये बसून फक्त कागदावरच काँग्रेस सर्जिकल स्ट्राइक करू शकते. कागदावर किंवा व्हिडिओ गेममध्ये सर्जिकल स्ट्राइक करायची असेल तर 3 असो वा 6, 20 असो वा 25, खोट्या लोकांना काय फरक पडतो.
 

आरटीआयमध्ये झाला सर्जिकल स्ट्राइकचा खुलासा
मीडिया रिपोर्टनुसार, रोहित चौधरीने साल 2018 मध्ये आरटीआय फाईल केली होती. त्यात त्यांनी 2004 ते 2014 च्या दरम्यान झालेल्या सर्जिकल स्ट्राइकची माहिती मागितली होती. त्यानंतर मंत्रालयाने आरटीआयला उत्तर देताना सांगितले की, त्यांच्याकडे फक्त 1 सर्जिकल स्ट्राइकची माहिती आहे, जी 29 सप्टेंबर 2016 ला उत्तर कश्मीरमध्ये उरी हल्लानंतर झाली होती.