• Home
  • National
  • Lucknow District Session Court Bomb Attack on advocate Latest News and Updates

लखनऊ / न्यायालयाच्या आवारात बार असोसिएशनच्या जॉइंट सेक्रेटरीवर बॉम्ब हल्ला, 6 वकील जखमी; घटनास्थळावर तीन जिवंत बॉम्ब आढळले

  • वजीरगंज पोलिस स्टेशन परिसरातील सीजेएम न्यायालय परिसरावर झाला हल्ला

दिव्य मराठी वेब टीम

Feb 13,2020 05:32:29 PM IST

लखनऊ(उत्तर प्रदेश)- येथील जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात आज(गुरुवार) दुपारी बार असोसिएशनचे संयुक्त मंत्री संजीव लोधी यांच्या देशी बनावटीच्या बॉम्बने हल्ला करण्यात आला आहे. या जीवघेण्या हल्यात लोधी गंभीर जखमी झाले आहेतर तर त्यांच्यासोबत इतर 5 वकीलदेखील जखमी झाले आहेत. पोलिसांना घटनास्थळावर तीन जिवंत बॉम्बदेखील आढळले आहेत.

लखनऊ जिल्हा सत्र न्यायालयच्या गेट नंबर तीनजवळ बार असोसिएशनचे संयुक्त संजीव लोधी यांचे चेंबर आहे. ते काही वकीलांसोबत चेंबरच्या बाहेर उभे होते. तेव्हा हल्लेखोरांनी त्यांच्यावर चार बॉम्ब फेकले, त्यातील एक बॉम्ब ब्लास्ट झाला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर संंशयितांची ओळख पटवली जात आहे. या घटनेनंतर वकीलांच्या तीव्र प्रतिक्रीया येत आहेत.


संजीव लोधी यांनी केली सुरक्षेची मागणी


पीडित वकील संजीव लोधी यांनी या घटनेनंतर प्रशासनाला सुरक्षेची मागणी केली आहे. ते म्हणाले की, प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी. गुंडं बॉम्ब आणि शस्त्र घेऊन न्यायालय परिसरात कसकाय आले ? हाच मोठा प्रश्न आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

X