आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लुडो गेमवर जुगार,सात जणांना अटक: 58 हजार रुपयांचा ऐवज जप्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली- कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चुंचा येथे बुधवारी पोलिसांनी लुडो गेम अड्ड्यावर छापा मारून ७ जणांना ताब्यात घेत ५८ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.

 

आखाडा बाळापूर पोलिसांनी चुंचा  येथे बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास  केलेल्या या कारवाईत संजय परसराम मोहिते, सुनील दत्तराव कणके, गणपत सीताराम पवार, परसराम हरिसिंग जाधव, पांडुरंग संभाजी चंद्रवंशी, सय्यद आरेफ सय्यद फरहान व रामराव शेषराव शेळके (सर्व रा. चुंचा)  यांना अटक केली. फौजदार उमाकांत चिंचोलकर यांच्या पथकाने ही कारवाई केली  आहे. या आरोपींकडून २८ हजार रुपये रोकड आणि ३० हजार रुपये किमतीचे मोबाइल असा एकूण ५८ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...