आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॅलेन डि अाेर : माॅड्रिच हा पुरस्कार जिंकणारा क्राेएशियाचा पहिला खेळाडू; १० वर्षांनंतर मेसी, राेनाल्डाे नाही ठरले यंदा मानकरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस - क्राेएशियाच्या फुटबाॅलपटू लुका माॅड्रिचला यंदा २०१८ च्या बॅलेन डि अाेर पुरस्काराने गाैरवण्यात अाले. त्याची सत्रातील कामगिरी काैतुकास्पद ठरली. फुटबाॅलच्या विश्वात जागतिक स्तरावरील हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळवणारा माॅड्रिच हा क्राेएशियाचा पहिला फुटबाॅलपटू ठरला अाहे. मिडफील्डर माॅड्रिचच्या नेतृत्वाखाली क्राेएशिया संघाने यंदा विश्वचषकाची फायनल गाठली हाेती.
 
ताे स्पॅनिश क्लब रिअल माद्रिदकडून खेळताे. रियल माद्रिदने सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन्स लीगचा किताब पटकावला. गत २००८ ते २०१७ पर्यंत हा पुरस्कार केवळ अर्जेंटिनाच्या लियाेनेल मेसी अाणि पाेर्तुगालच्या क्रिस्टियानाे राेनाल्डाे यांच्यापैकी एकालाच मिळत हाेता. मात्र, अाता ही परंपरा माॅड्रिचने खंडित केली. त्याने यंदा सरस खेळीच्या बळावर हा बहुमान पटकावला. त्याला फिफानेही बेस्ट प्लेअर पुरस्काराने गाैरवले अाहे. 

 

राेनाल्डाे ६ वेळा दुसऱ्या स्थानी 
माॅड्रिच ७५३ गुणांसह अव्वलस्थानी राहिला. राेनाल्डाे (४७६) दुसऱ्या व ग्रिजमॅन (४१४) तिसऱ्या स्थानी राहिला. राेनाल्डाेेने सहाव्यांदा दुसरे स्थान गाठले. मेसी हा पाच वेळा दुसऱ्या स्थानाचा मानकरी ठरला. एम्बापेने चाैथे व मेसीने यंदा पाचवे स्थान गाठले. जगभरातील १८० मीडिया पर्सन यासाठी मतदान करतात. 


माॅड्रिचची विक्रमी कामगिरी : यंदा वर्ल्डकपमध्ये गाेल्डन बाॅल 
मेसी २००६ नंतर प्रथमच टाॅप-३ मध्ये स्थान मिळवू शकला नाही. 
चार वेळा चॅम्पियन्स लीगचा (२०१३-१४, १५-१६, १६-१७, १७-१८) किताब जिंकला. 
तीन वेळा क्लब विश्वचषक (२०१४, २०१६, २०१७) जिंकण्याचा पराक्रम. 
२०१८ च्या फिफा वर्ल्डकपमध्ये बेस्ट प्लेअरचा (गाेल्डन बाॅल) मानकरी ठरला. 

 

यंदाचे सत्र ठरले अविस्मरणीय 
मी मैदानावर काैतुकास्पद कामगिरी केली, हेच सर्व काही हा पुरस्कार सांगताे. हे वर्ष माझ्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले. 


त्यामुळे हे शब्दांत सांगणे कठीण अाहेे. -लुका मॉड्रिच 

फ्रान्सचा प्रतिभावंत खेळाडू एम्बापे यंग प्लेअर पुरस्काराचा मानकरी 
फ्रान्सच्या एम्बापेला बेस्ट यंग प्लेअर पुरस्काराने गाैरवण्यात अाले. त्याची यंदाच्या विश्वचषकातील कामगिरी वाखण्याजाेगी ठरली. त्यामुळे ताे विश्वचषकात चांगलाच चर्चेत ठरला. या या स्पर्धेत अव्वल कामगिरी करताना फ्रान्ससाठी १० गाेल केले.

 

नाॅर्वेची एडा हेगरबर्ग ठरली पुरस्कार विजेती जगातील पहिली महिला खेळाडू 
नॉर्वेची एडा हेगरबर्ग हा पुरस्कार जिंकणारी जगातील पहिली महिला खेळाडू ठरली. तिला महिला गटात गाैरवण्यात अाले.२३ वर्षीय हेगरबर्गने फ्रान्सच्या क्लब लियाेनकडून खेळताना तिसऱ्यांदा चॅम्पियन्स लीग ट्राॅफी पटकावली. गतवर्षी तिने फ्रेंच लीगमध्ये सर्वाधिक ३१ गाेल केले हाेते. चॅम्पियन्स लीगमध्ये १५ गाेल केले. २०१६ मध्ये तिने युएफा प्लेअर अाॅफ द इयरचा पुरस्कारही जिंकला. हेगरबर्नला अव्वल कामगिरीमुळे काेपा ट्राॅफी मिळाली. 


 

बातम्या आणखी आहेत...