आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Luxembourg Is The First Country In The Public Transport free World; Bus, Rail And Tram Travel Travel Is Not Necessary

लक्झमबर्ग सार्वजनिक वाहतूक मोफत देणारा जगातील पहिला देश; बस, रेल्वे व ट्राममध्ये प्रवास भाडे देण्याची आवश्यकता नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लक्झमबर्ग सिटी- युरोपातील सातवा सर्वात लहान देश लक्झमबर्ग पुढील वर्षाच्या उन्हाळ्यात सार्वजनिक वाहतूक सुविधा मोफत करणार आहे. अशा प्रकारची सुविधा देणारा जगातील पहिला देश असेल. लक्झमबर्गमध्ये बस, रेल्वे व ट्राममधून प्रवास करणाऱ्या लोकांना कोणत्याही प्रकारचे भाडे देण्याची गरज नाही. या देशाची लोकसंख्या ६ लाख आहे. कमी लोकसंख्या असूनही येथे कायम वाहतुकीची समस्या आहे. यामुळे देशातील पर्यावरणाचे संतुलन व वाहतूक समस्या सोडविण्यासाठी सरकारने हे खास योजना आखली आहे. बुधवारी झेव्हियर बॅटल यांनी लक्झमबर्गचे पंतप्रधान म्हणून शपथ ग्रहण केली आहे.  

 

लक्झमबर्ग सिटीची वाहतूक व्यवस्था जगात सर्वात वाईट 
लक्झमबर्गची राजधानी लक्झमबर्ग सिटीची वाहतूक व्यवस्था जगात सर्वात वाईट समजली जाते. एक लाख दहा हजार लोकसंख्येच्या या शहरात ४ लाख लाेक कामासाठी येतात. तर देशाची लोकसंख्याच फक्त ६ लाख आहे. एका संशोधनानुसार लक्झमबर्ग सिटीमध्ये २०१६ मध्ये वाहतूक कोंडीमुळे एका चालकाचे ३६ तास वाया गेलेले होते, असा उल्लेख आहे. 

 

माध्यमिक शाळेच्या मुलांना येण्या-जाण्याची मोफत सेवा
सरकारने आधीपासूनच २० वर्षापर्यंतच्या माध्यमिक शाळेतील मुलांना घरापासून शाळेत जाण्यासाठी व येण्यासाठी मोफत सेवा देण्यात आली आहे. कोणत्याही व्यक्तीस दोन तासापेक्षा जास्त प्रवास असल्यास १.७८ पाऊंड (१६० रुपये) द्यावे लागतात. म्हणजे २५९० चौरसफुट क्षेत्रफळ असलेल्या देशात फिरण्यासाठी कोणाही व्यक्तीस १६० रुपये द्यावे लागतील. 

 

२०२० पर्यंत देशभरात सर्व तिकिटे बंद होतील
लक्झमबर्गमध्ये २०२० पर्यंत सर्व प्रकारची तिकिटे बंद होतील. यामुळे किराया गोळा करण्याचे केंद्र व तिकिटे विकत घेणाऱ्यावर लक्ष ठेवण्यच्या खर्चात बचत होईल. मोफत वाहतूक सेवेसाठी कोणत्या प्रकारचे धाेरण अाखले जाईल, हे अद्याप सरकारने स्पष्ट केले नाही. रेल्वेत फर्स्ट क्लास व सेकंड क्लासच्या कंपार्टमंेटवर लक्ष द्यावे लागेल. 

बातम्या आणखी आहेत...