आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमटेकच्या विद्यार्थ्याची औरंगाबादेत गळफास घेऊन आत्महत्या; स्पर्धा परीक्षेची करत होता तयारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- देवगिरी महाविद्यालयाच्या मायक्रोबायोलॉजीच्या एम.टेक.च्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सायंकाळी 6.30 वाजता हा प्रकार समोर आला. विश्वास प्रभाकर म्हस्के (23, रा. पाथरवाला बुद्रुक, ता. गेवराई) असे मृताचे नाव आहे.

 

मागील 4 ते 5 वर्षांपासून विश्वास शिक्षणानिमित्त शहरात वास्तव्यास होता. पदमपुऱ्यातील सोनार गल्लीत तो स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या महादेव नावाच्या मित्रासोबत राहायचा. शुक्रवारी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास त्याचा मित्र खोलीवर गेला असता विश्वास दरवाजा उघडत नव्हता. त्यामुळे मित्र व स्थानिकांनी दरवाजा तोडला असता गळफास घेतलेल्या स्थितीत तो आढळला. त्याला तत्काळ घाटीत नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी मृत घोषित केले. प्राथमिक तपासात खोलीत कुठलीही चिठ्ठी सापडली नाही. दरम्यान, विश्वास आई-वडिलांना एकुलता एक आहे. त्याची एक विवाहित बहीण शहरातच राहते. सकाळी त्याने मित्राला आपण सायंकाळी ताईकडे जाणार असल्याचे सांगितले होते.

बातम्या आणखी आहेत...