Home | National | Other State | Mab Linching in Jharkhand: people forced to announce the announcement of Jay Shriram

झारखंडमध्ये माॅब लिंचिंग : जय श्रीरामच्या घोषणा द्यायला भाग पाडले, युवकाला बांधून मारहाण; पोलिसांनी ठाण्यात डांबले, ५ व्या दिवशी मृत्यू

दिव्य मराठी नेटवर्क, | Update - Jun 25, 2019, 09:02 AM IST

घटना १७ जूनची, सोमवारी प्रकरण संसदेत गाजले, पोलिस ठाणेप्रमुख निलंबित

  • Mab Linching in Jharkhand: people forced to announce the announcement of Jay Shriram
    तबरेज मदतीसाठी ओरडत होता, जमावाने जबर मारहाण केली ; पोलिसांनी बेड्या ठोकल्या, थेट ठाण्यात नेले व कोठडीत डांबले

    सरायकेला - झारखंडच्या सरायकेला जिल्ह्यात जमावाने तबरेज अन्सारी नावाच्या युवकाला खांबाला बांधून रात्रभर मारहाण केली. मोटारसायकल चोरीच्या संशयावरून मारहाण करत जमावाने त्याला जय श्रीराम आणि जय हनुमानच्या घोषणा देण्यास भाग पाडले. सकाळी पोलिसांनी त्या युवकाला रुग्णालयात नेण्याऐवजी कोठडीत डांबले. अस्वस्थतेच्या कारणावरून मारहाणीनंतर चौथ्या दिवशी रुग्णालयात पोहोचवले. तेथे पाचव्या दिवशी शनिवारी त्याचा मृत्यू झाला. सोमवारी हे प्रकरण संसदेत गाजले. त्यानंतर सरकारने दोन ठाणे प्रमुखांना निलंबित केले. एका डीएसपीच्या अध्यक्षतेखाली चौकशीसाठी एसआयटी नेमली. आतापर्यंत या प्रकरणी आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. घटनेचा व्हिडिअो आणि फोटोवरून आरोपींची ओळख पटवली जात आहे. या प्रकरणी तबरेजची पत्नी शाइस्ता परवीनने सरायकेला ठाण्यात तक्रार दिली आहे. दीड महिन्यापूर्वीच तबरेजचे लग्न झाले होते.

    चोरी करण्यासाठी आला होता : डीएसपीचा प्राथमिक अहवाल
    सरायकेलाच्या उपायुक्तांनी गृह विभागाला पाठवलेल्या प्रारंभिक अहवालात म्हटले की, तबरेज १७ जूनच्या रात्री आपल्या दोन साथीदारांसह धातकीडीह भागातील एका घरात घुसला होता. त्याचे साथीदार पळाले, तर जमावाने तबरेजला पकडले. या प्रकरणी तीन सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. पोलिसांच्या मते, तबरेजने सोनू असल्याचे सांगत वाचण्याचा प्रयत्न केला होता. नंतर खरे नाव सांगितले. त्यानंतर जमावाने त्याला धार्मिक घोषणा द्यायला लावल्या.

Trending