आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धेडछाड : एक माथेफिरू रात्री मुलींच्या हॉस्टेलमध्ये घुसून काढत होता स्वतःचे कपडे, करत होता अश्लील चाळे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - येथील विजय नगर भागातील महिला आणि 50 हॉस्टेलमधील 500 विद्यार्थिनी एका 28 वर्षीय माथेफिरू तरुणांमुळे वर्षभरापासून त्रस्त होत्या. हा माथेफिरू रात्री हॉस्टेलमध्ये घुसून स्वतःचे कपडे काढत होता तर कधी भिंतीवरून उडी मारून घरात घुसून बेडरूममध्ये डोकावत होता. विजय नगर पोलीस स्टेशनमध्ये लोकांनी तक्रार दाखल केली परंतु पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्यामुळे लोकांनीच त्याला पकडले.


मुली रात्री हॉस्टेलमध्ये झोपलेल्या असताना आला आरोपी
स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी तरुण एका हॉस्टेलमध्ये घुसून रुमपर्यंत पोहोचला. त्याने स्वतःच्या अंगावरील सर्व कपडे काढले. आवाज ऐकून विद्यार्थिनी जाग्या झाल्या आणि तरुणाला पाहून मोठमोठ्याने ओरडू लागल्या. लोक तेथे पोहोचेपर्यंत तो पळून गेला. या तरुणाला पकडण्यासाठी कॉलोनीत राहणारे जज पीसी गुत्प आणि इलेक्ट्रिक इंजिनिअर राजेंद्र शुक्ला यांनी स्थानिक लोकांसोबत एक मिटिंग घेतली. त्यानंतर सर्वानी पैसे जमा करून सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. तरुणाला पकडण्यासाठी लोक रात्री जागरण करू लागले. शुक्ला यांनी गुरुवारी सकाळी 4.30 वाजता आपल्या सीसीटीव्हीमध्ये एका तरुणाच्या हरकती पाहून शेजारी राहणाऱ्या वीरेंद्र याना फोन करून सूचना दिली आणि इतरही लोकांना अलर्ट केले. सर्वांनी मिळून त्याला पकडले. आधी त्याची भरपूर धुलाई केली आणि नंतर 100 नंबरवर पोलिसांना सूचना दिली. तपासामध्ये त्याने स्वतःचे नाव धीरज लक्ष्मीलाल त्रिपाठी असे सांगितले. तो मूळचा अलाहाबाद येथील राहणारा आहे. सुमन नगरमध्ये राहून हॉटेलमध्ये काम करतो. रहिवाशांनी सांगितले की, पोलिसांनी कलम 151 ची प्रतिबंधात्मक कारवाई करून तरुणाला सोडून दिले.


लोकांनी आरोपीला पोलिसांकडे फक्त सोपवले, कोणीही तक्रार दाखल केली नाही
आरोपीवर सामान्य गुन्हा नोंदवून त्याला सोडून दिल्यामुळे स्थानिक लोकांचा पोलिसांवर राग आहे. पोलिसांनी तर काहीच केले नाही आणि आम्ही पकडून दिले तर कठोर शिक्षा करण्याऐवजी त्याला लगेच त्याला सोडून दिले. यावर पोलिसांनी सांगितले की, स्थानिक लोकांनी आरोपी धीरज त्रिपाठीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. कोणत्याही रहिवाशाने त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली नाही. यामुळे पोलिसांनी कलाम 151 अंतर्गत कारवाई केली. जर कोणी तक्रार दाखल केली असतील तर आम्ही त्या आधारे तयावर केस दाखल केली असती. सुधीर अरजरीया, टीआय, विजय नगर.

बातम्या आणखी आहेत...