आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महायुतीसह महाआघाडीच्या नेत्यांमध्ये बंडखोरीचा सूर, पाडापाडीच्या राजकारणात मनधरणीचे प्रयत्न

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माढा - माढा विधानसभा मतदारसंघात महायुतीसह महाआघाडीतील नेत्यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी अर्ज भरले आहेत. मतदार संघातील बंडखोरीचा पॅटर्न असाच राहिल्यास पाडापाडीचे राजकारण होणार यात शंका नाही. पक्ष श्रेष्ठींना नाराज नेत्यांच्या समजूत व मनधरणी करण्यासाठी, बंडाळी रोखण्यासाठी दुपारी तीन पर्यंत वेळ असणार आहे. पाच टर्म माढ्याचे प्रतिनिधित्व करीत असलेले विद्यमान आमदार बबनराव शिंदे हे सहाव्या टर्म साठी निवडणुकीसाठी रिंगणात उतरले आहेत. मात्र त्यांच्या पक्षातील राजूबापू पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करुन बंडखोरी केली आहे. राजुबापू पाटील यांची बंडखोरी शमविण्यात पक्षश्रेष्ठींना यश मिळते का? हे आज पहावे लागणार आहे.

बंडाळीला रोखण्याचे आव्हान भाजपा शेकाप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांपुढे उभे ठाकले आहे. कदाचीत दिखाऊ पणासाठी काही उमेदवार अर्ज माघारी घेतील. पण हे अधिकृत पक्षांच्या उमेदवाराचा काम व प्रचार करतीलच याची काही शाश्वती नाही.
 भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब साठे,माढ्याच्या नगराध्यक्षाअॅड मीनल साठे,राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते राजूबापु पाटील, शेकापचे अॅड सुरेश उर्फ बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाचे माजी सभापती शिवाजी कांबळे, राष्ट्रवादी चे पंडित देशमुख या तालुक्यातील प्रमुख दिग्गजानी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 7 ऑक्टोबर रोजी आज अर्ज माघार घेण्याचा दिवस आहे. नेमके कोणते उमेदवार माघार घेतात.हे पाहणे औत्सकुतेचा विषय ठरणार असुन याकडे मतदारसंघातील मतदारांचे लक्ष वेधले आहे. बंडखोरी अशीच कायम राहिली तर मात्र मतदार संघाची निवडणुक बहुरंगी तर होईलच. शिवाय अधिकृत पक्षाच्या उमेदवारांना याचा अधिक फटका बसणार आहे.

माढा विधानसभा मतदार संघाची जागा ही महायुतीतून पारंपरिकरित्या शिवसेनेकडेच आहे. त्यानुसार बहु प्रतीक्षेनंतर संजय कोकाटे यांची उमेदवारी जाहीर झाली. अर्ज देखील भरला. मात्र कोकाटे यांनी अर्ज भरण्याआधीच पाच वर्षांपासून भाजपा पक्षात कार्यरत असलेल्या साठे कुटुंबियांनी आपली स्वतंत्र भूमिका घेतली. भाजप जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब साठे व माढाच्या नगराध्यक्षा अॅड मीनल साठे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज शक्ति प्रदर्शनासह उमेदवारी अर्ज  भरला आहे. भाजपा पक्षात सक्रिय असुन देखील कामे होत नसल्याची पक्षा विषयी माजी आमदार साठे यांनी खंत व्यक्त करत मी भाजपा पक्षावर नाराज असल्याचे त्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत जाहीर केले. आणि माजी आमदार साठे यांच्या स्नुषा अॅड मीनल साठे, तर पुत्र दादासाहेब साठे यांनी अर्ज भरला आहे. भाजपा पक्ष श्रेष्ठी साठे ची मनधरणी करण्यात यशस्वी ठरतात. का हेच पाहणे रंजक ठरणार आहे.