आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेव्हणीने केला प्रेमात विश्वासघात; त्याने पोटच्या मुलांची हत्या करून स्वतः घेतला गळफास

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संदीप शिंदे  

माढा - मेव्हणीने प्रेमात दगाबाजी केल्याने जन्मदात्या पित्यानेच आपल्या पोटच्या दोन मुलांची विष पाजून हत्या करुन स्वतः गळफास घेऊन आपले जीवन संपवले आणि प्रेमाच्या धुंदीत काही मिनिटातच त्याने कुटुंबाची राख रांगोळी केली. मेव्हणी मात्र पोलिसांच्या हाती सापडलेली नाही. माढा तालुक्यातील बेंबळे गावच्या शिवारात ही हृदय पिळवटून टाकणारी घटना गुरुवारी सायंकाळी घडली होती. शुक्रवारी प्रकरणाचा उलगडा रविंद्र लोखंडे यांच्या खिश्यात सापडलेल्या चिठ्ठी वरुन कयास काढला आहे. दरम्यान ही घटना अनैतिक संबंधातून घडल्याचा दाट संभव व्यक्त होत आहे.

शुक्रवारी दुपारी दोघा चिमुकल्यांचा उपचार सुरु असताना मृत्यु झाला तर एका मुलीवर उपचार सुरु आहेत. रविंद्र प्रभाकर लोखंडे (वय 35),  आयुष (वय 6), तर अजिंक्य (वय 9) अशी मृतांची नावे आहेत. तर मुलगी अनुष्का (वय 11) हिच्यावर सोलापूर सिव्हील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हे सर्व जण वडापुरी ता.इंदापुर गावचे रहिवासी आहेत. टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे स.पो.नि राजेंद्र गदूम, विलास बनसोडे, पोलीस कॉन्स्टेबल केशव झोळ हे पुढील तपास करीत आहेत.


स्वंयलिखीत चिठ्ठीतून मेव्हणी सोबतच्या संबंधाचा उलग
डा 
रविंद्र लोखंडे यांच्या कपड्यांची तपासणी केली असता त्यांच्या खिश्यात एक मोबाईल व चिठ्ठी आढळून आली. चिठ्ठीमध्ये मेव्हणी सुनिता कांबळे हिने प्रेमसंबंधामध्ये विश्वासघात केल्याने तिच्या गावी (बेंबळे) माझ्या आणि मुलांचे जीवन संपवत असून त्यांच्या मृत्यूस सुनिता कांबळे याच  जबाबदार असल्याचे या चिठ्ठीत नमुद केले आहे.

रविंद्र लोखंडे हे आपल्या तिन्ही मुलांसोबत बेंबळे गावातील मेव्हणीकडे गुरुवारी दुपारी आले होते. मात्र घर बंद होते. त्यामुळे ते मुलांना घेऊन उजनी कालवा किलोमीटर एक्कावन्न मधील एका झाडाखाली जाऊन थांबले. त्यांनी अगोदर भजी आणि थम्सअप मधून मुलांना विष खाऊ दिले, नंतर स्वतः झाडाला गळफास घेतला.