Madha water / उदयनराजेंनी केले रणजीतसिंह निंबाळकरांचे कौतुक, नीरा डाव्या कालव्यावरून राष्ट्रवादीला घरचा आहेर

 
उदयनराजेंचा शरद पवारांना टोमणा

दिव्य मराठी वेब

Jun 13,2019 04:48:00 PM IST

सातारा- माढा लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचीत भाजप खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी आज साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी उदयनराजेंनी खासदार रणजीतसिंहांचे कौतुक केले आहे. खासदार झाल्यानंतर मतदारसंघातील जनतेसाठी घेतलेल्या पाण्याच्या धाडसी निर्णयाबद्दल उयनराजेंनी रणजित निंबाळकरांचे कौतुक केले.

रणजीत निंबाळकर यांच्या पाठपुराव्यानंतर जलसंपदा विभागाने नीरा डाव्या कालव्यातून बारामतीला जाणारे अनधिकृत पाणी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या पाठपुराव्याबद्दल उदयनराजेंनी रणजीतसिंह निंबाळकरांचे कौतुक केले.


उदयनराजेंचा शरद पवारांना टोमणा
यावेळी, नीरा डाव्या कालव्याचे पाणी सोडण्यावरुन उदयनराजेंनी राष्ट्रवादीलाच टोमणा मारला आहे. ते म्हणाले,"नीरा डाव्या कालव्याचा अध्यादेश काढण्यासाठी उशीरच झाला. हा अध्यादेश आघाडीच्या कार्यकाळातच काढायला हवा होता", अशी प्रतिक्रिया उदयनराजेंनी दिली. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात नीरा डाव्या कालव्याचे अनधिकृत पाणी माढ्याला देण्यावरुन जोरदार राजकारण सुरू आहे.

X
COMMENT