आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गडकरींमुळे जमतंय या 'बेरोजगार' युवकाचे लग्न! गावभर पेढे वाटले, बॅनर लावून मानले आभार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माढा - सरकारच्या एका निर्णयामुळे सामान्य लोकांचे आयुष्य कसे बदलते याचे जिवंत उदाहरण माढा येथे समोर आले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या एका निर्णयामुळे माढा उपळाई गावातील एका युवकाचे आयुष्य नेहमीसाठी बदलले. एकेकाळी रोजगार नसल्याने फिरणाऱ्या या युवकाच्या हाती आता रोजगार आला आहे. सोबतच, कित्येक दिवसांपासून रखडलेले लग्न सुद्धा आता जमणार आहे. सरकारच्या नवीन आदेशावर या युवक इतका खुश झाला की त्याने गावभर पेढे वाटले. लोकांना चहा-पान दिला आणि चक्क केंद्रीय मंत्र्यांना सुद्धा स्पीड पोस्टने पेढे वाटले. नेमके काय घडले या युवकाच्या आयुष्यात हे जाणून घेऊ...


सरकारच्या एका निर्णयाने पलटले नशीब
माढा तालुक्यातील उपळाई खुर्द येथे राहणारा महावीर विष्णू टोणपे वाइट आर्थिक परिस्थितीमुळे शालेय शिक्षण सुद्धा पूर्ण करू शकला नाही. छोटी-मोठी कामे करून आपला उदरनिर्वाह चालवला. परंतु, मोठा झाल्यानंतर कुटुंबियांनी लग्नासाठी दबाव टाकला. कुटुंबियांना मुलगी पाहण्याचे कार्यक्रम देखील सुरू केले. पण, हातात काम नसल्याने लग्न जमत नव्हता. सगळीकडून नकार मिळत असल्याने महावीर ड्रायव्हिंग शिकलेला होता. यालाच आपले रोजगाराचे साधन बनवण्याचा संकल्प त्याने घेतला. परंतु, आठवी पास नसल्याने नियमानुसार त्याला चारचाकी वाहनाचा परवाना मिळणे अशक्य होते. या नियमाने तो आतून खचला होता. त्यातच शासनाने ड्रायव्हिंग लायसन्ससाठी असलेली आठवी पासची अट शिथील केली.


10 वी पास झाल्यापेक्षा मोठा आनंद
यापेक्षा मोठी गोड बातमी आपल्यासाठी दुसरी असूच शकत नाही अशी प्रतिक्रिया महावीरने दिव्य मराठी प्रतिनिधीशी संवाद साधताना सांगितली. एखाद्या व्यक्तीला दहावीत पास झाल्यानंतर जसा आनंद होतो, त्याहूनही मोठा आनंद मला होत आहे. त्यामुळेच, गावभर पेढे वाटले आणि मंत्रालयास पत्र पाठवून आभार मानले. मंत्रालयाकडून महावीरला उत्तर देखील मिळाले आहे. यानंतर महावीरने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे स्पीड पोस्टने मिठाई पाठवली. गडकरींमुळेच रोजगार मिळाला आणि लग्नाचा मार्ग मोकळा झाला असे महावीरने सांगितले आहे. केवळ, मीच नव्हे, तर माझ्यासारखे असंख्य अडानी मात्र वाहन चालवण्यात तरबेज असलेल्यांकडून मी आभार मानतो असे त्याने बॅनरवर लिहिले आहे. गावात लावलेले हे बॅनर सर्वांचे लक्ष वेधत आहे.

बातम्या आणखी आहेत...