आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये थिरकताना दिसल्या मधू चोप्रा, जावयासोबत धरला ताल, वाइनचा ग्लास हातात पकडून निकनेही सासूबाईंसोबत धरला ठेका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास यांनी गुरुवारी बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी मुंबईत वेडिंग रिसेप्शनचे आयोजन केले होते. वांद्रास्थित हॉटेल ताज लँड्स अँडमध्ये ही ग्रॅण्ड पार्टी रंगली. या पार्टीचे इनसाइड व्हिडिओ समोर येत आहेत. एका व्हिडिओत प्रियांका चोप्राची आई मधु चोप्रा थिरकताना दिसत आहेत. खास गोष्ट म्हणजे त्यांनी यावेळी जावई नीकसोबत ताल धरला होतात. हातात वाइनचा ग्लास घेऊन नीकने सासूबाईंसोबत 'क्वीन' चित्रपटातील 'लंदन ठुमकदा'वर ताल धरला होता. त्यानंतर प्रियांकानेही नीकसोबत डान्स केला. पीसीने तिच्या गाजलेल्या 'देसी गर्ल'वर ठुमके लावले. 


प्रियांकाच्या रिसेप्शनमध्ये नव-याचा कोट नीट करताना दिसली दीपिका...
- प्रियांकाच्या रिसेप्शनमधील नवविवाहित दाम्पत्य रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांचाही एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत रणवीर मस्तीच्या मूडमध्ये डान्स करताना दिसतोय, तर दीपिका त्याचा कोट नीट करताना दिसतेय.
- रिसेप्शनमध्ये प्रियांका-निक आणि दीपिका-रणवीर यांच्यात डान्स कॉम्पिटिशन बघायला मिळाली. प्रियांकाने 'बाजीराव मस्तानी' चित्रपटातील 'पिंगा'वर निकसोबत ताल धरला तर दीपिकासुद्धा रणवीरसोबत याच गाण्यावर थिरकली.
-  नंतर दोन्ही कपलनी 'दिल धडकने दो' या चित्रपटातील 'गल्ला गूडियां'वरही डान्स केला.
- दीपिका-रणवीरने लग्नानंतर 1 डिसेंबर रोजी मुंबईत रिसेप्शन ठेवले होते. पण याचदिवशी प्रियांकाचे लग्न असल्याने ती त्यांच्या रिसेप्शनमध्ये सहभागी होऊ शकली नव्हती. काही महिन्यांपूर्वी जेव्हा रणवीर आणि दीपिका यांनी त्यांच्या लग्नाची तारीख घोषित केली होती, तेव्हा सर्वप्रथम प्रियांकाने त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. तर प्रियांकाच्या रिसेप्शनचे पहिले आमंत्रण दीपिकाला मिळाले होते.  
- प्रियांकाने दीपिका आणि रणवीरसोबत 'बाजीराव-मस्तानी'(2015) या चित्रपटात काम केले होते. त्यानंतर प्रियांका रणवीरसोबत 'दिल धडकने दो' या चित्रपटातही झळकली होती. 

 

प्रियांका-निकच्या रिसेप्शनमध्ये पोहोचले हे सेलेब्स... 
निकयांकाच्या रिसेप्शनमध्ये सलमान खानसह दीपिका-रणवीर, कतरिना कैफ, स्वरा भास्कर, परिणीती चोप्रा, राजकुमार राव आणि त्याची गर्लफ्रेंड पत्रलेखा, करण जोहर, कियारा आडवाणी, यामी गौतम, डाएना पेंटी, नवाज़ुद्दीन सिद्दीकी, दीया मिर्झा, सोफी चौधरी, कार्तिक आर्यन, हरमन बावेजा, जॅकी भगनानी, डिनो मोरया, तनिषा मुखर्जी, गोविंदा, अनिल कपूर, अनुपम खेर, सतीश कौशिक, बॉबी देओल, पूजा हेगडे, राज बब्बर, अमीषा पटेल, साऊथ अॅक्ट्रेस तमन्ना भाटिया, पत्नी प्रियांकासोबत विवेक ओबरॉय, रवीना टंडन, जायरा वसीम, रणधीर कपूर, कंगना रनोट रेखा, विद्या बालन, संजय दत्तसह अनेक बॉलिवूड स्टार्स पोहोचले होते.


1 आणि 2 डिसेंबर रोजी झाले प्रियांका-निकचे लग्न...
प्रियांका-निक यांनी जोधपूरच्या उम्मेद पॅलेस भवन येथे 1 आणि 2 डिसेंबर रोजी लग्न थाटले. 1 डिसेंबर रोजी दोघांचे ख्रिश्चन आणि 2 डिसेंबर रोजी हिंदू पद्धतीने लग्न झाले. लग्नानंतर 4 डिसेंबर रोजी प्रियांकाने नवी दिल्लीत रिसेप्शन दिले होते. त्याला पीएम मोदींनी हजेरी लावली होती. दुसरे रिसेप्शन 19 डिसेंबर रोजी मुंबईतील जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलमध्ये झाले. हे रिसेप्शन प्रियांकाने बिझनेस क्षेत्राशी संबंधत लोकांसाठी आयोजित केले होते.
 

बातम्या आणखी आहेत...