आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येणार \'कॉफी विद करण\'चा सर्वात मोठा एपिसोड, माधुरी आणि संजय दत्त येणार एकत्र!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. करण जोहरचा प्रसिध्द शो 'कॉफी विद करण' यावेळी डिफरेंट आणि यूनीक जोड्यांमुळे प्रसिध्द होत आहे. सीनजच्या सुरुवातीला दीपिका पदुकोण आणि आलिया भट आल्या होत्या. यानंतर जान्हवी कपूर आपला भाऊ अर्जुन कपूरसोबत आली होती. यानंतर सारा अली खान वडील सैफसोबत लवकरच दिसणार आहे. पण आता संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यामध्ये एकत्र दिसणार आहे असे वृत्त आहे. करण जोहर या दोघांना शोमध्ये एकत्र घेऊन येण्याची प्लानिंग करत आहे. करणने माधुरी आणि संजय दत्तला निमंत्रण पाठवले आहे. पण अजुनही दोघांकडूनही काहीच रिअॅक्शन आलेली नाही. माधुरी आणि संजय दत्त करण जोहरचा आगामी चित्रपट 'कलंक' मध्ये एकत्र काम करत आहेत. जर माधुरी आणि संजय दत्तने करणची ही ऑफर स्विकारली तर हा शो करणसाठी ब्लॉकबस्टर एपिसोड होऊ शकतो. 

 

करणच्या शोमध्ये ओपन होऊ शकतात हे सस्पेंस 
सस्पेंस नंबर 1

1991 मध्ये 'साजन' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान माधुरी आणि संजय दत्त जवळ आले होते असे बोलले जाते. दोघांना लग्नही करायचे होते. पण माधुरीचे वडील या नात्याविरुध्द होते. कारण संजय त्यावेळी विवाहित होता त्याला एक मुलगीही होती. अशा वेळी माधुरीचे वडील खरंच विरोधात होते का? आणि का विरोधात होते? याचे रहस्य उलगडू शकते.

 

सस्पेंस नंबर 2 
1993 च्या बॉम्बे बॉम्ब ब्लास्टमध्ये संजयचे नाव आले होते, तेव्हा माधुरी त्याच्यापासून वेगळी झाले असे बोलले जाते. वेगळे झाल्यानंतर दोघांनी कोणतेच चित्रपट एकत्र केले नाहीत. माधुरी आणि संजयचे नाते मोडण्यामागे हेच कारण होते का? हे रहस्य उलगडू शकते.


सस्पेंस नंबर 3 
संजय दत्तच्या 'संजू' या चित्रपटात माधुरी आणि संजय दत्तची लव्हस्टोरी दाखवली जाणार अशा चर्चा सुरुवातीला होत्या. पण नंतर माधुरीने या सर्व गोष्टींना नकार दिला असे वृत्त आले. माधुरी खरेच असे बोलली होती का? हे सत्य समोर येईल. 

 

सस्पेंस नंबर 4 
2017 मध्ये गोवा फेस्ट दरम्यान संजय दत्तला विचारण्यात आले की, त्याला संधी दिली तर तो कोणत्या बॉलिवूड अभिनेत्रीसोबत लग्न करेल? याचे उत्तर देताना तो म्हणाला होता की, कुणी मान्यता दत्तला ओळखते का? कोणी नाही ओळखत? मी माधुरी दीक्षितसोबत लग्न करु इच्छितो. त्याचे हे उत्तर ऐकूण लोक टाळ्या वाजवत होते. संजय माधुरीला अजुनही विसरु शकला नाही का? पण संजय स्पष्टिकरण देत म्हणाला की, हे सर्व तो मस्करीत बोलला. 
 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...