आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​Video: माधुरी दीक्षितने केला 'चोली के पीछे क्या है' वर डान्स, 25 वर्षांपुर्वी गाण्यावर झाला होता वाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: माधुरी दीक्षितचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये ती सोनाक्षी सिन्हा आणि डायना पेंटीसोबत 'चोली के पीछे क्या है' गाण्यावर डान्स करताना दिसतेय. माधुरी सध्या 'डान्स के दीवाने' या रियालिटी शोची जज आहे. येथे 'हॅप्पी भाग जाएगी' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोनाक्षी आणि डानया आल्या होत्या. यावेळी अभिनेत्री माधुरी दीक्षितने त्यांच्यासोबत ताल धरला. 25 वर्षांपुर्वी हे गाणे संजय दत्त यांचा चित्रपट 'खलनायक' वर चित्रित करण्यात आले होते.

 

42 पॉलिटिकल पार्ट्यांनी केला होता विरोध 
- 25 वर्षांपुर्वी 'चोली के पीछे' या गाण्यावर वाद झाला होता. 42 पॉलिटिकल पार्ट्या या गाण्याच्या विरुध्द होत्या. याविरुध्द आंदोलनही काढण्यात आले होते. गाण्याची सिंगर इला अरुणने एका मुलाखती दरम्यान सांगितले की, ज्यावेळी त्यांना हे गाणे ऑफर झाले होते तेव्हा त्या घाबरल्या नव्हत्या. कारण असे बोल मी पहिल्या लोकगीतांमध्ये ऐकले होते. परंतू त्यांची को-सिंगर अलका याज्ञनिक त्यावेळी घाबरल्या होत्या. इलानुसार त्यांनी गाण्याला फक्त आवाज दिला होता. त्यांना यामध्ये डान्स करण्याचीही इच्छा होती. परंतू फक्त गाणे गायल्यामुळेच त्यांना समन पाठवण्यात आला. यामुळे त्यांनी माधुरी दीक्षितसोबत स्क्रिन शेअर करण्यास नकार दिला होता. नंतर त्यांच्याऐवजी नीना गुप्ताला घेऊन ही शूटिंग करण्यात आली. 

बातम्या आणखी आहेत...