आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माधुरी दीक्षित-नेने घेऊन येतेेय 'पंचक', शुटिंगला झाली सुरुवात, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मराठमोळ्या अभिनेत्याची लागली वर्णी 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : बॉलिवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षित-नेने आता चित्रपट निर्मिती क्षेत्राकडे वळली असल्याचे सगळ्यांनाच ठाऊक आहे.  '15 ऑगस्ट' या मराठी चित्रपटानंतर आता माधुरी आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने 'पंचक'' हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत.  आज (10 ऑक्टोबर) या चित्रपटाचा मुहूर्त झाला. माधुरीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन चित्रपटाच्या सेटवरचा एक फोटो शेअर केला असून यात ती पती नेनेंसोबत दिसत आहे. दोघांच्याही हातात क्लॅप बोर्ड आहे. फोटो शेअर करुन माधुरीने लिहिले, ''निर्माती म्हणून अजून एक रोमांचक चित्रपट "पंचक" तुमच्यासाठी घेऊन येत आहोत, पांचकच्या संपूर्ण टीमला माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा.'' 

  • राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याची वर्णी...

या चित्रपटात एका मराठमोळ्या कलाकाराची वर्णी लागली आहे. पंचकच्या निमित्ताने हा अभिनेता माधुरी दीक्षितसोबत दुसऱ्यांदा काम करतोय. या अभिनेत्याचे नाव आहे आदिनाथ कोठारे. आदिनाथचा माधुरी दीक्षितसोबत हा दुसरा प्रोजेक्ट आहे. माधुरीची निर्मिती असलेल्या '15 ऑगस्ट' या चित्रपटातही आदिनाथने काम केले आहे. आदिनाथने 'पाणी' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्याच्या या कलाकृतीला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.    

  • तेजश्री प्रधानसोबत जमली आदिनाथची जोडी...

पंचक या चित्रपटात आदिनाथसोबत मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांची तगडी फौज आहे. सध्या अग्गबाई सासूबाई या मालिकेत झळकणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिची पंचक या चित्रपटासाठी निवड झाली आहे. आदिनाथ कोठारे आणि तेजश्री प्रधान ही नवी जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. या दोघांसह आनंद इंगळे, नंदिता पाटकर, भारती आचरेकर, विद्याधर जोशी, सतीश आळेकर, सागर तळशीकर, दिप्ती देवी, आशिष कुलकर्णी या कलाकारांच्या पंचकमध्ये महत्त्वाच्या भूमिका आहेत.   

  • 'पंचक' चित्रपटात कोकणची पार्श्वभूमी...

पंचक या चित्रपटाला कोकणची पार्श्वभूमी असून हा विनोदी अंगाने जाणारा चित्रपट असेल.  चित्रपटाविषयी बोलताना माधुरी म्हणाली, चित्रपटाची कथा एका कुटुंबाभोवती गुंफण्यात आली असून त्यांचा अंधश्रद्धेवर असलेला विश्वास विनोदी पद्दतीने यात दाखवण्यात येणार आहे.  हा चित्रपट प्रेक्षकांना भरपूर हसवणारा असेल.  जयंत जठार या  चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. या अगोदर जयंत जठार हे 'कच्चा लिंबू', 'नटरंग' आणि 'फॅमिली कट्टा' चित्रपटांशी जोडले गेले आहेत.