मुंबईः अभिनेत्री माधुरी दीक्षितचा एक डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत माधुरी 'मुगल ए आजम' (1960) या चित्रपटातील 'मोहे पनघट पे नंदलाल' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. माधुरीचा हा व्हिडिओ 'डान्स दीवाने' या डान्स रिअॅलिटी शोच्या सेटवरील आहे. या शोमध्ये माधुरीने मधुबालाच्या गाजलेल्या गाण्याला रिक्रिएट करुन तिला ट्रिब्युट दिले. माधुरीच्या अदा आणि सौंदर्य बघून सेटवर टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.