आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Madhuri Dixit, Salman Khan To Katrina Kaif Anil Kapoor Films Release In 2019

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार रिअल लाइफ बाप-मुलीची जोडी, 18 वर्षांनी पडद्यावर रोमान्स करताना दिसणार बॉलिवूडचं एक फेव्हरेट कपल, 2019 मध्ये रिलीज होणार आहेत या दिग्गज स्टार्सचे 15 चित्रपट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः 2019 या नवीन वर्षात अनेक बॉलिवूड दिग्गजांचे चित्रपट रिलीज होणार आहेत. सलमान खान, कतरिना कैफ, सोनम कपूर, आलिया भटपासून ते माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर स्क्रिनवर झळकणार आहेत.  रिअल लाइफ बाप-मुलीची जोडी अर्थातच अनिल कपूर आणि सोनम कपूर पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' या चित्रपटात अनिल कपूरआ णि सोनम कपूर बाप-मुलीच्या भूमिकेत झळकतील. हा चित्रपट येत्या 1 फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर बॉलिवूडची फेमस जोडी म्हणजेच अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित तब्बल 18 वर्षानंतर  'टोटल धमाल' या चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट 22 फेब्रुवारी रोजी रिलीज होईल. यावर्षभरात रिलीज होणा-या चित्रपटांविषयी जाणून घेऊयात या पॅकेजमध्ये... 

 

- यावर्षभरात 50 कोटींहून अधिकचे बजेट असलेले एकुण 100 चित्रपट रिलीज होणार आहेत. तर बॉलिवूडचा सर्वात महागडा चित्रपट असलेल्या महाभारतचे चित्रीकरण यावर्षी सुरु होईल. रिपोर्टनुसार, 2019 मध्ये बॉलिवूड चित्रपटांची कमाई 2018 च्या तुलनेत 2650 कोटींहून अधिक असेल. गेल्यावर्षीची एकुण कमाई 15,890 कोटींच्या घरात झाली होती. हा आकडा वाढून यावर्षी 18,540 कोटी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

 

- 2018 मध्ये 210 चित्रपट भारतभर प्रदर्शित झाले होते.


 पुढील स्लाईड्सवर वाचा, 2019 मध्ये रिलीज होत असलेल्या चित्रपटांबद्दल...