आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्काराचे दृश्य केल्यानंतर प्रचंड बिथरली होती ही अॅक्ट्रेस, व्हिलनला म्‍हणाली होती- हात लावू नकोस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मीटू मोहिमेनंतर अनेक सेलिब्रिटी त्यांच्यासोबत घडलेल्या अन्यायाला वाचा फोडू लागले आहेत. या प्रकरणात नाना पाटेकर, विपुल शहांसह अनेक मोठी सेलिब्रिटी अडकले आहेत. खासगी आयुष्यात अभिनेत्रींचे लैंगिक छळ झाल्याचे या मोहिमेमुळे समोर आले आहे. पडद्यावर अभिनय करतानाही अनेक अभिनेत्रींना अशा घटनांना सामोरे जावे लागले आहे. अलीकडेच अभिनेते दलीप ताहिल यांनी खुलासा केला की, 20 ते 25 वर्षांपूर्वी एका दिग्दर्शकाने त्यांना रेप सीनमध्ये अभिनेत्री जबरदस्तीने किस करण्यास सांगितले होते. पण त्यांनी तसे करण्यास नकार दिला होता. तर बाबुमोशाय बंदुकबाज या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी दिग्दर्शकाने अभिनेत्री चित्रांगदा सिंगसोबत असभ्य वर्तन केल्याचे समोर आले होते. त्यानंतर चित्रांगदाने हा चित्रपट सोडला होता. आज आम्‍ही तुम्‍हाला माधुरी दीक्षित हिच्यासोबत 80च्‍या दशकात घडलेला एक अत्‍यंत चर्चित असा किस्‍सा सांगणार आहोत. 

 

काय घडले होते माधुरीसोबत... 
80च्या दशकात माधुरी फिल्म इंडस्‍ट्रीमध्‍ये नवीनच होती.‍ तिचे मोजकेच सिनेमे रिलीज झाले होते. तेव्‍हा माधुरीला 'प्रेम प्रतिज्ञा' नावाचा सिनेमा ऑफर झाला होता. सिनेमात तिचा हिरो होता मिथून चक्रवर्ती आणि व्हिलन होता रंजीत. या सिनेमात एक रेप सीन होता. हा सीन केल्‍यानंतर रंजीत यांचा माधुरीला असा धसका बसला की, तिने सरळ रंजीत यांना सांगितले होते की, मला हात लावू नकोस. तसे तर सिनेमात रेप सीन असणार आहे, याची माधुरीला पूर्वीच कल्‍पना देण्‍यात आली होती आणि माधुरीही यासाठी तयार होती. मात्र सीननंतर ती प्रचंड बिथरली होती.

 

सीन शूट होण्‍यापूर्वी माधूरीच्‍या मनात होती धाकधुक... 
80 च्‍या दशकात रंजीत हे सर्वाधिक लोकप्रिय असे व्हिलन होते. फिल्‍म 'प्रेम प्रतिज्ञा' मध्‍ये एक रेप सीन असणार होता, जो माधुरी आणि रंजीत यांच्‍यामध्‍ये शूट केला जाणार होता. माधुरीही या सीनसाठी पूर्ण तयार होती. मात्र शूटिंगपूर्वी या सीनमुळे माझा प्रचंड गोंधळ उडाला होता, असे माधुरीने एका मुलाखतीत सांगितले आहे. माधुरी सांगते की, 'रेपसीनबद्दल माझ्या मनात खूप प्रश्‍न निर्माण झाले होते. रेप सीन कसा शूट होईल, या प्रश्‍नामुळे मी प्रचंड गोंधळली होती.'

 

व्हिलनच्या इमेजमुळे घाबरली होती माधुरी... 
तेव्‍हा माधुरी रंजीत यांच्‍या व्हिलनच्‍या इमेजमुळे त्‍यांना घाबरली होती, असे या सीनबद्दल जाणकारांचे म्‍हणणे आहे. माधुरीने कसाबसा तो सीन पूर्ण केला. सीन पूर्ण शूट झाल्‍यांनतर संपूर्ण टीम शॉटवर समाधानी होती. मात्र रंजीत आणि सिनेमाचे दिग्‍दर्शक बापू यांना वाटले की, हा सीननंतर माधुरी काहीशी अस्‍वस्‍थ वाटत आहे. सीन शूट झाल्‍यानंतर रंजीत आणि बापू माधुरीजवळ गेले आणि तिला विचारले की, 'सर्वकाही ठीक आहे ना. सीन शूट करताना काही अडचण तर नाही जाणवली.' यावर माधुरीने उत्‍तर दिले होते की, तिला काहीही वाईट वाटले नाही. मात्र हा सीन झाल्‍यानंतर ती प्रचंड घाबरली होती. स्‍वत: रंजीत यांनीही सांगितले की, सीननंतर माधुरी प्रचंड घाबरली होती. तेव्‍हा अशी चर्चाही होती की, सीननंतर माधुरी रंजीत यांना हात न लावण्‍याबद्दल म्‍हणाली होती. 

बातम्या आणखी आहेत...