आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उठताच मॉर्निंग वॉक, मग लाइट ब्रेकफास्ट, एनर्जीसाठी आठवड्यातून 4 ते 5 वेळा डान्स प्रॅक्टिस, दिवसभरात पिते खूप पाणी, 51 वर्षांच्या माधुरी दीक्षितचे पूर्ण वर्कआउट आणि डाएट Plan

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क : डायरेक्टर इंदर कुमारची फिल्म 'टोटल धमाल' चा ट्रेलर सोमवारी रिलीज झाला. माधुरी दीक्षित या फिल्मने 5 वर्षांनंतर पुन्हा सिल्वर स्क्रीनवर कमबॅक करत आहे. 51 वर्षांच्या वयातही माधुरी खूप सुंदर आणि फिट दिसत आहे. 

 

आज आम्ही तुम्हाला माधुरीच्या फिटनेस सीक्रेटबद्दल सांगणार आहोत...
- माधुरी सकाळी उठल्यावर सर्वात आधी मॉर्निंग वॉकसाठी जाते आणि घरी आल्यावर लाइट ब्रेकफास्ट घेते, ज्यामध्ये कार्बोहाइड्रेड कमी आणि प्रोटीन  जास्त असते. 

- माधुरी दीक्षित फिट राहण्यासाठी प्रत्येक 2 तासाला काही ना काही खाते. डाएटमध्ये ती सर्वात जास्त हिरव्या पालेभाज्या आणि फळे खाते. याबरोबरच ती दिवसभरात खूप पाणी पिते. 

 

शिमला मिरची आहे फेव्हरेट... 
माधुरी आपल्या डाएटमध्ये शिमला मिरचीही सामील करते. तिचे म्हणणे आहे की, शिमला मिरचीमध्ये फायबर असते. जे मेटाबॉलिजम वाढवते आणि ब्लड प्रेशर आणि हार्टला कंट्रोलमध्ये ठेवते. यामध्ये कॅलरीज असल्यामुळे वजनही कंट्रोलमध्ये राहते. 

 

जापानी डाएट आवडते...  
- माधुरीला आपली फिटनेस चांगली ठेवण्यासाठी जापानी डाएट जास्त आवडते. तिला जेवणामध्ये उकडलेले, भाजलेले, शेकलेले किंवा हलकेसे तळलेले जेवण आवडते. हेच कारण आहे की, ती टोफू, मिक्स भाज्या आणि मशरूमला जापानी कुकिंग स्टाइलमध्ये बनवून खाते. 

- तिला हर्बल चहाब घ्यायला आवडते. स्वतःला हाइड्रेड ठेवण्यासाठी ती शहाळे पिते. नारळाच्या पाण्यात असलेले पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नीशियम आणि सोडियम बॉडीला एनर्जी देतात. 

 

जिममध्ये जायला आवडत नाही... 
माधुरीला जिममध्ये जायला आवडत नाही. ती स्वतःला फिट ठेवण्यासाठी आउटडोर एक्सरसाइज, रनिंग आणि स्पोर्ट्स एक्टिविटी करते. रोज 15 ते 20 मिनटे योगा करते. ती आठवड्यातून 4 ते 5 दिवस डान्स (कथक) ची प्रॅक्टिस करते. डान्स केल्याने तिला सर्वात जास्त एनर्जी मिळते. 

 

ग्लोनिंग स्किन... 
माधुरीच्या ग्लोइंग स्किनचे सिक्रेट आहे की, रोज झोपण्यापूर्वी चेहऱ्याला क्‍लीनजरने साफ करते. कधी कधी टोनरचाही वापर करते. त्याचबरोबर चेहऱ्याची  फ्रेशनेस कायम ठेवण्यासाठी पुरेशी झोप घेते. 

बातम्या आणखी आहेत...