आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रगतिशील ‘बुकर’

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅविन बेरी, ओयिंकान ब्रेथवेट, लकी एल्मन, मॅक्स पोर्टर, एलिफ शफाक, जिनेट विंटरसनसारख्या ख्यातनाम लेखक आणि त्यांच्या कादंबऱ्यांना मागे टाकत दोन महिलांनी यंदाचा प्रतिष्ठित‘बुकर’पटकावलाय...


२०१९ चे बुकर पुरस्कार नुकतेच प्रदान करण्यात आले. मार्गारेट एटवूड आणि बर्नरडाइन एवरिस्टो यांना संयुक्तरीत्या या पुरस्कारानं यंदा सन्मानित करण्यात आलं. खरं तर यात नवीन असं काहीच नाही. कारण बुकर पुरस्कारांची दरवर्षी घोषणा होते. पुरस्कार प्रदान केले जातात. मात्र यंदाच्या ‘बुकर’चं काही खास वैशिष्ट्य होतं. या पुरस्कारासाठी मार्गारेट आणि एव्हरिस्टो यांची संयुक्तपणे निवड करण्यात आली. त्याचप्रमाणं अरबी भाषेतील कादंबरीकार जोखा अल्हार्थी यांनाही बुकरनं सन्मानित करत बुकरनं प्रगत पाऊल उचललं आहे. संयुक्त पुरस्कारासाठी निवड झालेल्या दोघींपैकी एव्हरिस्टो या हा पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला आणि पहिल्या ब्रिटिश लेखिका ठरल्या आहेत. तर दोनदा बुकर मिळवणाऱ्या मार्गारेट या हा पुरस्कार मिळवणाऱ्या सर्वात ज्येष्ठ लेखिका ठरल्या आहेत. मार्गारेट यांना यापूर्वी २००० मध्ये त्यांच्या, The Blind Assasin साठीही या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.  मार्गारेट यांची, The Handmaid’s Tale या कादंबरीची आणि एव्हरिस्टो यांची, Girl, Women, Other या कादंबरीची बुकरसाठी निवड करण्यात आली. जोखा अल्हार्थी या आंतरराष्ट्रीय पातळीवरील अशा पद्धतीचा पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या  अरब भाषिक लेखिका ठरल्या आहेत. जोखा यांच्या, ‘कॅलेस्टियल बॉडीज’साठी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. मूळ अरबी भाषेतील जोखा यांच्या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद करण्यात आलेला आहे. बुकर पुरस्कारांची सुरुवात १९६९ मध्ये करण्यात आली होती. १९९२ मध्ये पहिल्यांदा दोन लेखकांना संयुक्तरूपानं या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर पुरस्काराच्या नियमावलीत बदल करण्यात येऊन पुरस्कार एकालाच प्रदान करण्याची प्रथा सुरू झाली. मात्र यंदा परीक्षकांनी नियम बाजूला सारून मार्गारेट आणि एव्हरिस्टोच्या गुणवत्तेचा सन्मान केला आहे.